Sanjay Rathod And Ashish shelar saam tv
महाराष्ट्र

भाजप जनतेला किती मूर्ख समजते, संजय राठोड यांच्या मंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद मिळाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार काल मंगळवारी पार पडला. सरकारमधील १८ आमदारांनी मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना संजय राठोड (Sanjay Rathod) यांना पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणामुळं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पंरतु, संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद मिळाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप नेत्या (Chitra Wagh) चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या मंत्रिपदाला विरोध दर्शवला असतानाच कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनीही हल्लाबोल केला आहे. संजय राठोड यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश हा शिंदे गटाचा प्रश्न आहे, असे सांगून आशिष शेलार यांनी हात झटकणे हा भाजपाचा दांभिकपणाचा कळस आहे, अशी खरमरीत टीका सावंत यांनी भाजपवर केली आहे.

सचिन सावंत यांनी ट्विवरवरून विरोधकांवर शरसंधाान साधलं आहे. सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, संजय राठोड यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश हा शिंदे गटाच्या प्रश्न असे म्हणून आशिष शेलार यांनी हात झटकणे हा भाजपाचा दांभिकपणाचा कळस आहे. मग मविआ सरकारमधून राजीनामा द्यावा ही मागणी भाजपा नेते एकनाथ शिंदे यांना विचारुन करत होते का? जनतेला भाजपा किती मूर्ख समजते ते दिसून येते, अशा शब्दात सावंत यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.

"संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद मिळणं अत्यंत दुर्देवी"

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात कोणताही आरोप नसलेल्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या आमदारांना मंत्रिपद दिले जाईल, असे बोलले जात होते. मात्र, मागील सरकारमध्ये एका तरुणीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप असलेले संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती. एका तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेले असले तरीही मी त्यांच्याविरुद्धचा माझा लढा सुरूच ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे और जितेंगे, असे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Wash Risks: सलोनमध्ये केस धुतल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Maharashtra Live News Update: वेण्णालेक येथे अडकलेली बोट बाहेर काढण्यात आली, पर्यटकांनी सोडला सुटकेचा निश्वास

Shocking: नवऱ्याचं दुसऱ्या महिलेसोबत लफडं; बायकोने घडवली कायमची अद्दल, गुप्तांगावर फेकलं उकळतं पाणी अन् अ‍ॅसिड

Thamma Collection : 'थामा'ची बंपर ओपनिंग; पहिल्याच दिवशी 'सैयारा'ला पछाडलं, रश्मिका-आयुष्मानची जोडी सुपरहिट

Prajakta Mali Family Photo: अभिनेत्री प्राजक्ता माळीने कुटुंबासोबत साजरी केली दिवाळी, लक्ष्मीपूजनाचे खास फोटो शेअर

SCROLL FOR NEXT