Rahul Gandhi Visit Party Worker Home:  Saamtv
महाराष्ट्र

Rahul Gandhi Kolhapur: राहुल गांधींचे मोहब्बत की दुकान! 'कौलारु' घरात पाहुणचार अन् दिलखुलास गप्पा; टेम्पो चालकाचे कुटुंबीय भारावले

Rahul Gandhi Visit Party Worker Home: सामान्य कार्यकर्त्याच्या कौलारु घरात राहुल गांधी भेटीसाठी आल्याचे समजताच परिसरात त्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी जमली. या गर्दीला आवरताना पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली.

Gangappa Pujari

Rahul Gandhi Kolhapur Visit: राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा प्रचंड चर्चेत आली. राहुल गांधींच्या या हजारो किलोमीटरच्या प्रवासात त्यांच्या साधेपणाचे, हळव्या स्वभावाचे, कार्यकर्त्यांशी दिलखुलास संवाद साधण्याचे अनेक किस्से गाजले, मोहब्बत की दुकान असं नाव दिलेल्या या यात्रेतील खास क्षणांची सोशल मीडियावर तुफान चर्चा पाहायला मिळाली. तेव्हापासून राहुल गांधी आपल्या प्रत्येक दौऱ्यामध्ये आपल्या साधेपणाने लोकांचे, कार्यकर्त्यांचे मन जिंकतात. आज त्यांच्या कोल्हापुर दौऱ्यातही असाच साधेपणा पाहायला मिळाला, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा..

लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर त्यांनी शाहू समाधीस्थळी अभिवादन केले.परंतु या कार्यक्रमापेक्षा राहुल गांधींनी एका छोट्या कार्यकर्त्याच्या घरी दिलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

टेम्पो चालकाच्या घरी भेट..

सकाळी साडे आठ वाजता राहुल गांधी यांचे कोल्हापुर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर उतरताच राहुल गांधींनी कोल्हापूरच्या उचगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील टेम्पोचालक अजित तुकाराम संधे यांचे घर गाठले. अजित संधे हे काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते तसेच टेम्पोचालक आहेत. एका सामान्य कार्यकर्त्याच्या कौलारु घरात राहुल गांधी भेटीसाठी आल्याचे समजताच परिसरात त्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी जमली. या गर्दीला आवरताना पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली.

राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथाला आदि दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी टेम्पोचालक अजित तुकाराम संधे यांच्या कुटुंबियांशी तासभर चर्चा केली. यावेळी संधे यांच्या घरी त्यांनी वांग्याची भाजी अन् कांद्याची पात असा खात बनवला होता, ज्यावर राहुल गांधींनी ताव मारला. राहुल गांधी यांनी घरी दिलेल्या भेटीने संधे कुटुंबीयही चांगलेच भारावुन गेले. काँग्रेस नेत्याच्या या खास भेटीची अन् साध्या पाहुणचाराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT