sameer wankhede News Latest Update  SAAM TV
महाराष्ट्र

Sameer Wankhede News : समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीवर महाराष्ट्रातील बड्या नेत्याला वेगळाच संशय, म्हणाले...

Sameer Wankhede CBI enquiry : समीर वानखेडे सरसंघचालकांना भेटल्यानंतर त्यांची चौकशी सुरू होण्याची कारणं काय? ‘दाल में कुछ काला है’, अशी शंका काँग्रेस नेत्याने व्यक्त केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aryan Khan bribery case Sameer Wankhede questioned By CBI : एनसीबीचे तत्कालीन विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरू झाल्यापासून भाजपचे (BJP) नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपूरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले आणि त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले म्हणाले की, 'समीर वानखेडे (Sameer Wankhede) सरसंघचालकांना भेटल्यानंतर त्यांची चौकशी सुरू होण्याची कारणं काय? ‘दाल में कुछ काला है’ असे दिसत आहे. या प्रकरणात काही ना काही लपलेले आहे, काही तरी संशयास्पद आहे किंवा समीर वानखेडे यांच्याकडे काहीतरी अशी माहिती आहे; ज्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपची पोलखोल ते करू शकतात.'

नाना पटोलेंनी उपस्थित केले अनेक प्रश्न

दुसरीकडे वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरू होताच महाराष्ट्रातील भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री फडणवीस व इतर काही मंत्री वानखेडेंच्या केसाला धक्का लावला तर पाहून घेऊ, असे म्हणत आहेत. सीबीआय, ईडी या तपास यंत्रणा तर भाजप सरकारच्याच अखत्यारित आहेत, मग वानखेडे यांच्या सीबीआय चौकशीचा भाजपला एवढा त्रास का होत आहे?

सरकारी अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाणे यात काही ना काही लपलेले आहे, हा काही आरोप नाही तर, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे, असं सांगतानाच नाना पटोले यांनी वेगळीच शंका उपस्थित केली.

आघाडीतील जागावाटपाचा निर्णय मेरिटनुसार

महाविकास आघाडीतील जागावाटपावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, प्रत्येक पक्षाने चाचपणी केली पाहिजे. यात काही गैर नाही; पण जागावाटपाचा निर्णय हा मेरिटवरच होईल. काँग्रेस पक्षाने काही समित्या नेमलेल्या आहेत, सर्व बाजूंचा विचार करून जागावाटप होईल.

मेरिटवर निर्णय झाला तर अनावश्यक चर्चा थांबेल. महाराष्ट्र हा परंपरागत काँग्रसेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून महापुरुषांचा अपमान व संविधानाचा अपमान करणाऱ्या भाजपला पराभूत करणे यासाठी आमचे काम सुरू आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच संपला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

Pushpa 2 Actor News: पुष्पा चित्रपटाचा स्टार अभिनेता अडचणीत! महिलेने केले लैंगिक शोषणाचे आरोप

Shirur News : धक्कादायक..सोने चोरीसाठी तोडला महिलेचा कान; दरोडेखोरांचे भयानक कृत्य

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT