Nana Patole vs PM Narendra Modi Saam TV
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'बेटी बचाव बेटी पटावो' अभियान राबवायला हवं; पटोलेंची जहरी टीका

भाजप मोठ्या प्रमाणात चुका करत आहे. मात्र, त्या चुकाही चांगल्या कशा बरोबर आहेत हे सांगण्यात भाजप पटाईत आहे - पटोले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे -

अमरावती: अमरावती काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रा अभियान कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात बोलताना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली, ते म्हणाले, मोदींनी 'बेटी बचाव बेटी पटावो' अभियान राबवायला पाहिजे अशी बोचरी टीका त्यांनी केली.

भाजप मोठ्या प्रमाणात चुका करत आहे. मात्र, त्या चुकाही चांगल्या कशा बरोबर आहेत हे सांगण्यात भाजप पटाईत आहे. मोदींनी 'बेटी बचाव बेटी पटावो' म्हटलं आहे, हे वाक्य तर काँग्रेसने म्हटलं असतं तर त्यांना जगणं मुश्किल केलं असतं तर पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत. ते फक्त भाजपचे पंतप्रधान आहे अशी टीकाही नाना पटोले यांनी मोदींवर केली.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, गोंदीया जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळा येथील आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी एका वाहनात कोंबुन नेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर राज्यभरातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच प्रकरणावर पटोले यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली.

आदिवासी मुलांना अशा प्रकारे जनावरांसारखा वाहतूक करणे हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिला नाही. या ईडीच्या सरकारला जनतेचं काही देणं घेणं नाही. या संपूर्ण घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. राज्याला लुटण्याचा काम होत असून ते थांबलं पाहिजे व जनतेला न्याय व्यवस्थेत आणलं पाहिजे अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: 36 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! भारतीय ज्युडोपटूंचा इतिहास; अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांची सुवर्णपदकाची कमाई

Maharashtra News Live: आदेश आला तर मंत्रीपद सोडण्याची तयारी- भरत गोगावले

गुलाबी अदा! प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नजर हटत नाही

BJP: मोठी बातमी! भाजपला मोठा हादरा, आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

नीट पेपर फुटतो कसा? सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल; सरकारला या २ गोष्टी सूचवल्या, बघा VIDEO

SCROLL FOR NEXT