Balasaheb Thorat  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत महत्वाचा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

Gangappa Pujari

Mahavikas Aaghadi CM Face Candidate: विधानसभा निवडणुकांची अवघ्या काही दिवसांमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती तसेच महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे निवडणुकांची तयारी सुरु असतानाच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. अशातच आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही मविआच्या मुख्यमंंत्रीपदाबाबत केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरु आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मीरा- भाईंदर येथे काँग्रेस पक्षाची कोकण विभाग जिल्हा आढावा बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय प्रभारी रमेश चेन्नीथाल, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, हुसेन दलवाई शाह भाई जगताप आदी प्रमुख नेते उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत महत्वाचा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

"महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बैठका आता संपत आल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला, महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद आहे. एकंदर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी खूप मोठ्या संख्येने जागा घेईल, असे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, असं आम्हालाही वाटतं, त्यामध्ये आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नाही, मात्र हा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे." असं ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला. भाजप घाबरलेला पक्ष आहे, जो चारशे पार करणार होते ते बहुमत मिळवू शकलेले नाहीत. राहुल गांधी यांच्याबाबत वाढता प्रतिसाद बघता भाजपची हवा गूल झाली आहे, राहुल गांधी यांना ठार मारण्याची धमकी देत आहेत, असे म्हणत हे सरकार सत्तेच्या बाहेर जाणार आहे..हरियाणा आणि जम्मु काश्मीरमध्ये आमची सरकार येणार म्हणून घाबरलेले आहेत, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

SCROLL FOR NEXT