Ashish Deshmukh, Nana Patole saam tv
महाराष्ट्र

Congress च्या निलंबनानंतर आशिष देशमुख नागपूरात, पटोलेंवर पुन्हा गंभीर आरोप (पाहा व्हिडीओ)

नागपूरात पाेहचताच आशिष देशमुखांनी काेणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

मंगेश मोहिते

Ashish Deshmukh News : काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख (ashish deshmukh latest marathi news) यांचे पक्षातून निलंबन करण्यात आल्यानंतर त्यांनी नागपुर येथे माध्यमांशी बाेलताना पुन्हा एका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आराेप केला. माझी काँग्रेसच्या हिताची भूमिका असल्याचे पुन्हा एकदा देशमुखांनी ठणकावून सांगितले आहे. (Breaking Marathi News)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने माजी आमदार देशमुख यांनी नाना पटालेंवर केलेल्या आराेपावरुन त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच देशमुख यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. त्यावर नागपूरात बाेलताना आशिष देशमुख यांनी नोटीसीला मी लवकरच सविस्तर उत्तर देणार आहे. मी अन्य काेणत्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशमुख म्हणाले शुक्रवार, शनिवार, रविवार असा मोठा विकेंड आल्याने विमानाच्या तिकीट वाढल्याने मी पुणे मार्गे नागपुरात आलो. ज्येष्ठ नेते शरद पवार गेल्या आठवड्यातच भेटले. पुन्हा एवढ्या लवकर त्यांना भेटण्याचा प्रश्नच नाही. मी काँग्रेसच्या शिस्तपलन समिती व वरिष्ठांना माझी भूमीका समजावून सांगेन असेही देशमुखांनी नमूद केले.

देशमुख म्हणाले नाना पटोले यांच्यामुळेच सरकार कोसळले. जर नोटीस द्यायची आहे तर ती नाना पटोले यांना द्यावी. नाना पटोले हायकमांडशी घनिष्ट संबंध असल्याचे सांगतात मात्र पटोलेंना देखील शिस्तभंगाची नोटीस बजावली पाहिजे अशी मागणी आशिष देशमुखांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धाराशिवमध्ये प्रवाशांच्या बसचा भीषण अपघात; जीवितहानी नाही

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा घसरले, प्रति तोळा इतकी किंमत; वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेट

SCROLL FOR NEXT