काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा भाजप उमेदवारासाठी प्रचार संजय डाफ
महाराष्ट्र

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा भाजप उमेदवारासाठी प्रचार

देशमुख यांचे कॉंग्रेस मध्येही मन रमत नसल्याची चर्चा

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - काँग्रेसने Congress काही दिवसांपूर्वीच राज्यातील कार्यकारणी जाहीर केली असून त्यामध्ये नेत्यांना नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सर्व नेते एकीकडे कामाला लागले असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर नियुक्त करण्यात आलेले माजी आमदार आशिष देशमुख Ashish Deshmukh यांनी चक्क भाजप BJP उमेदवाराचा प्रचाराला हजर झाल्यामुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा -

प्राप्त माहितीनुसार, आशिष देशमुख यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा उमेदवार पार्वता काळबांडे यांच्या प्रचारार्थ सावरगाव येथील त्यांच्या निवासस्थानी स्थानिक भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे फोटो आता व्हायरल झाले आहे. देशमुख यांची महिन्याभरापूर्वीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांचे काँग्रेसमध्ये मन रमत नसल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

आशिष देशमुख यांनी त्यांच्याच पक्षाचे क्रीडामंत्री सुनील केदार यांची काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्यावर आरोपही केले होते. या आरोपानंतर काँग्रेसकडून मनधरणी करत त्यांना काँग्रेस कमिटीवर घेण्यात आले आहे. त्यानंतर आता देशमुख यांनी भाजप नेत्यांची बैठक घेऊन एकच धुरळा उडवून दिला आहे. त्यामुळे आशिष देशमुख नेमके कोणत्या राजकीय पक्षात आहे हा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

SCROLL FOR NEXT