Narendra Modi Saam TV
महाराष्ट्र

मोदींना हरवण्याचं एकट्याचं काम नाही; काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचं वक्तव्य

'महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे दुर्लक्ष होतंय हे खरं आहे, काही प्रमाणात कमी निधी दिला जातोय, निधीसाठी आपण बोललं पाहिजे.'

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : मोदींना हरविण्याची कोणा एकट्याची पात्रता नाही. त्यामुळं सर्व पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेससोबत एक आघाडी तयार केली पाहिजे. काँग्रेसची एक ऐतिहासिक जबाबदारी आहे. सर्व स्थानिक समविचारी पक्षांना एकत्र घेऊन आघाडी केली पाहिजे, त्यांना समान वागणूक दिली पाहिजे. देशातील लोकशाही (Democracy) वाचवायची आहे, देशातील लोकशाही आणि संविधान टिकेल की नाही यात शंका आहे असं वक्तव्य काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं आहे.

देशात, राज्यात आणि आमच्या पक्षात बरंच काही घडतंय, देशात काहीशी चिंताजनक स्थिती आहे. ज्या राज्यात विरोधी पक्षांचं सरकार आहे त्या ठिकाणी केंद्राचा त्रास आहे. आज ईडी, CBI आणि इतर तपास यंत्रणांचा दहशत निर्माण करण्यासाठी उपयोग होतोय, हा देश हुकूमशाहीच्या दिशेने चालला आहे, रशियामध्ये सुरुवातीला हेच होतं, चीन आणि आता भारतात सुद्धा निवडणून आलेली हुकूमशाही पुढं येताना दिसते आहे असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

हे देखील पाहा -

शिवाय सर्व लोकशाही सारखं होईल, निवडणुका होतील, मात्र निवडून आल्यावर सूत्र एका हातात येतील, हुकूमशाही सारखं देशात परिस्थिती निर्माण होईल असं देखील ते म्हणाले. काँग्रेस पक्षाचे नेटवर्क संपूर्ण देशात आहे, त्यामुळं इतर पक्षाकडे नेतृत्व दिलं तर संयुक्त होणार नाही.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे (MVA) दुर्लक्ष होतंय हे खरं आहे, काही प्रमाणात कमी निधी दिला जातोय, निधी साठी आपण बोललं पाहिजे. पूर्णवेळ अध्यक्षपद निवडलं पाहिजे आणि पक्षातील निवडणुका घेतल्या पाहिजे, यासंदर्भात जेष्ठ नेत्यांनी बैठक पत्र लिहलं होतं, मात्र हे पत्र लिक झालं आणि गैरसमज झाला, तसं काही नव्हतं, स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कुणासोबत जायचं हा निर्णय घ्यायचा आहे, हा निर्णय सोपं नाही, भाजपला हरवायचे असेल तर तिन्ही पक्षांनी एकत्र पाहिजे असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasota Fort: सातारा जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वसलाय वासोटा किल्ला, पर्यटकांचे वेधून घेतोय लक्ष

टीचभर नेपाळची चीनसारखी वाकडी चाल; १०० रुपयांच्या नोटेवर ३ ठिकाणांवर दावा, भारताची सटकली!

BMC Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार; तेजस्वीनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

राजकारणात मोठा भूकंप! शिंदेसेना आणि काँग्रेसची युती, एकाच बॅनरवर झळकले एकनाथ शिंदे, राहुल आणि सोनिया गांधींचे फोटो

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित दादांसमोर शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी वजनावरून मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT