नागपुरात काँग्रेस उमेदवार बदलणार?; काँग्रेस अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा SaamTV
महाराष्ट्र

नागपुरात काँग्रेस उमेदवार बदलणार? काँग्रेस, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा

नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना काँग्रेसवर आपला उमेदवार बदलविण्याची नामुष्की ओढविली आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉ. छोटू भोयर हे गांभीर्याने निवडणुक लढवत नसल्याच्या अनेक काँग्रेस मतदारांच्या तक्रारी.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या (Nagpur Legislative Council Election) मतदानाला अवघे काही तास उरले असताना काँग्रेसवर आपला उमेदवार बदलविण्याची नामुष्की ओढविली आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉ. छोटू भोयर हे गांभीर्याने निवडणुक लढवत नसल्याच्या अनेक काँग्रेस मतदारांच्या तक्रारी होत्या. त्यामुळं छोटू भोयर ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर करण्याच्या तयारीत कॉंग्रेस आहे.

हे देखील पहा -

काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार छोटू भोयर हे भाजप BJP मधून आयात केलेले उमेदवार आहेत. भोयर यांचा मोठा गाजावाजा करत कॉंग्रेस मध्ये प्रवेश करण्यात आला. भाजप नगरसेवक आणि संघ स्वयंसेवक फोडून दाखविल्याबद्दल कॉंग्रेस नेत्यांनी आपली पाठ थोपटून घेतली होती. भोयर हे चमत्कार करतील असं सांगत त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. मात्र, प्रचारादरम्यान छोटू भोयर यांच्याबाबत नाराजी समोर आली. भोयर हे ताकदीने निवडणूक लढत नाहीत, कॉंग्रेस मतदारांशी संपर्क ठेवत नाहीत, ही निवडणूक त्यांनी गांभीर्याने घेतली नसल्याच्या अनेक तक्रारी कॉंग्रेस मतदारांनी केल्या आहेत.

त्यामुळं राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी दोन दिवसांपूर्वी निवडणुकीचे सूत्र हाती घेतली. सर्व नगरसेवकांशी चर्चा केल्यावर शेवटी उमेदवार बदलण्यावर एकमत झालं. छोटू भोयर यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देणार असल्याचं कळतंय. तसा प्रस्ताव पक्षाच्या हायकमांड कडे पाठविण्यात आलाय. मात्र, छोटू भोयर यांनी या चर्चा चुकीच्या असून आपणच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला आहे.

मात्र भाजपने या कॉंग्रेसच्या उमेदवार नाट्याचा चांगलाच आनंद आहे. काँग्रेसनं उमेदवार बदलला नाही बदलला तरी भाजपच जिंकेल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला आहे. कॉंग्रेस वर ऐनवेळी उमेदवार बदलण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. मात्र, यामुळं काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढविलीय. कॉंग्रेस मधील कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसून येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Buying: धनत्रयोदशीला सोने खरेदीचा विक्रम; एकाच दिवशी 1 लाख कोटींची खरेदी

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS: 7 महिन्यांनंतर RO-KO मैदानात; ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडेसाठी कुलदीप OUT हर्षित IN

Ratnagiri Tourism : मनाला भुरळ घालणारा रत्नागिरीतील ट्रेकिंग स्पॉट, दिवाळीत ट्रिप प्लान करा

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीची दिवाळी, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT