congress andolan for regular electric supply to farms saam tv
महाराष्ट्र

Congress Andolan : शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी बुलढाणा जिल्ह्यात काॅंग्रेसचे अनाेखे आंदाेलन, सुताची माळ मुख्यमंत्र्यांना पाठविली भेट

जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस व वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतीची माेठे नुकसान झाले. अद्याप शेतक-यांना सरकराने मदत केली नाही.

संजय जाधव

Buldhana :

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतक-यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी या व अन्य मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदाेलकांनी चरख्याने सुताची माळ तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांना भेट पाठविली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यामध्ये 22 जुलै 2023 व 26/27 फेब्रुवारी 2024 रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस व वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्याचे महसूल प्रशासनाने सदोष पंचनामे करून नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित ठेवले आहे.

याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी व शेतकरी बांधवांना तात्काळ मदत मिळावी तसेच शेती कर्ज माफ करावे यासाठी तसेच शेतकऱ्यांना दिवसा आठ तास किंवा रात्री तरी नियमित विद्युत पुरवठा व्हावा याकरिता काँग्रेसच्या वतीने जळगाव जामोद येथे काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदाेलनात माेठ्या संख्येेने शेतकरी सहभागी झाले हाेते. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Maharashtra Live News Update: मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT