Shinde Government  Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: शिंदे गटाकडून काँग्रेसला सुरुंग, 8 नगरसेवकांची पक्षाला सोडचिट्ठी

आठ नगरसेवकांचा जाहीर सत्कार आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.

संजय जाधव

बुलडाणा : शिवसेनेते फूट पाडल्यानंतर शिंदे गटाने आपला मोर्चा इतर पक्षांकडे वळवला आहे. विविध पक्षातून अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आता शिंदे गटाने बुलडाण्यात काँग्रेसला सुरुंग लावलं आहे.

बुलडाण्यात काँग्रेसच्या 8 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या 8 नगरसेवकांचा जाहीर सत्कार आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.

मोताळा आठवडी बाजार येथील मैदानावर जाहीर सभेत काँग्रेसच्या 8 नगरसेवकांनी जाहीर प्रवेश केला. काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे धीरज लिंगाडे निवडून आले. त्याचा आनंद साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस मोठा धक्का बसला आहे.कारण जिल्ह्यातीलच मोताळा येथील नगरसेवक शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय.

आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. नगरपंचायतमध्ये लवकरच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची सत्ता स्थापन करून आपण शहराच्या विकासाला चालना देऊ, असे आश्वासन आमदार गायकवाड यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT