CM eknath shinde  Saam TV
महाराष्ट्र

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे महानगरपालिकेवर नाराज; स्थानिक तक्रारींमुळे आयुक्तांना पाठवली नोटीस

Pune Municipality Commissioner: याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात स्थानिक नगरसेवक नसणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कामांकडे दुर्लक्ष होणे अशा तक्रारी नागरिकांकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्यात.

Ruchika Jadhav

Pune News:

पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बरीच विकासकामे प्रलंबित आहेत. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींनाचा सामना करावा लागतोय. कामे पूर्ण व्हावीत यासाठी नागरिकांनी आपल्या अडचणीचा पाढा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे वाचला आहे. ऑनलाईन आणि पत्र व्यवहार करत नागरिकांनी विकासकामांबाबत तक्रार केलीये. नागरिकांची होणारी गैरसोय पाहून मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात स्थानिक नगरसेवक नसणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कामांकडे दुर्लक्ष होणे अशा तक्रारी नागरिकांकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्यात. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुणे महानगरपालिका आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

गेल्या काही काळापासून पुण्यातील विविध समस्या मार्गी लावण्यात आलेल्या नाहीत. यासह केलेल्या तक्रारींची व्यवस्थित दखल घेण्यात येत नाहीये. त्यामुळे नागरिकांनी थेट ऑनलाइन पद्धतीने तक्रारी दाखल केल्यात. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या आहेत.

तक्रारींवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रतिसाद देण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री सचिवालय आणि कार्यालयाकडे आलेले अर्ज आणि निवेदनांची यादी करण्यात आलीये. ही यादी टोकन नंबरसह सबंधित सरकारी कार्यालयांना पाठवण्यात आली आहे. संबंधित कार्यालयांनी प्रलंबित कामांमध्ये केलेली कार्यवाही आणि अर्जदारास दिलेले उत्तर कार्यालयास सादर करावे, असा आदेश जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

SCROLL FOR NEXT