Gunaratna Sadavarte Saam Tv
महाराष्ट्र

सांगली शहर पोलीस ठाण्यात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंविरोधात तक्रार

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तक्रारदार डॉ.संजय पाटील यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. 'सिल्व्हर ओक' या शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांकडून (St employee) करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर १०५ कर्मचाऱ्यांसह सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. या प्रकरणासह राज्यभरात तब्बल ७ पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे देखील पहा :

एकीकडे सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणात आज हायकोर्टाकडून (High Court) सदावर्ते यांच्यासह १०५ जणांना दिलासा देण्यात आला. मात्र, इतर गुन्ह्यात अजूनही सदावर्ते अडकले आहेत. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचे वंशज व मराठा समाजातील प्रतिष्ठीत लोकांबद्दल प्रसार माध्यमासमोर जातीय तेढ निर्माण करून समाज विघातक विधाने करून त्यांची प्रतिमा मलीन करून लोकांना भडकावल्याप्रकरणी सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिरज (Miraj) शहर पोलीस ठाण्यापाठोपाठ सांगली (Sangli) शहर पोलीस ठाण्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) समन्वयक तक्रारदार डॉ.संजय पाटील यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT