तन्मय टिल्लू , साम प्रतिनिधी
राज्यातील लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असली तरी बीडमध्ये जातीय ध्रुवीकरणाचा मुद्दा अजुनही धगधगता आहे. आता एका व्हिडीओनं बीडमध्ये खळबळ उडालीय. मराठा आंदोलनात गडावरील महाराजांसह कीर्तनकारांनी सहभाग घेतला त्यामुळे मराठा समाजाच्या महाराजांना गावच्या सप्ताहात बोलवायचं नाही असा ठराव वंजारी समाजानं घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. नेमकं काय घडतंय बीडमध्ये पाहूया.
लोकसभा निवडणूक संपली असली तरी बीडमधील जातीय ध्रुवीकरणाचं राजकारण अद्याप शमलेलं नाही. आता एका व्हिडीओनं बीडमध्ये खळबळ उडालीय. मराठा आंदोलनात गडावरील महाराजांसह कीर्तनकारांनी सहभाग घेतला. त्यामुळे मराठा समाजाच्या महाराजांना गावच्या सप्ताहात बोलवायचं नाही असा ठराव वंजारा समाजानं घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा कथित व्हिडिओ मुंडेवाडी गावातील असल्याचं बोललं जातंय. या व्हिडीओनंतर पोलीस अक्षीक्षकांनी मुंडेवाडी गावात जाऊन एका तरूणाला अटक केलीय.
बीडमध्ये कोणतीही जातीय तेढ नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. दरम्यान या व्हिडीओवरून मनोज जरांगे पाटलांनी मुंडे भावा-बहिणीकडे बोट दाखवत नाराजी व्यक्त केलीय. बीडमधील कथित व्हिडिओनंतर प्रशासनाने याप्रकरणाची तात्काळ दखल घेतलीये..मात्र जातीचं विष कालवणारे समाजकंटक कोण याचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण जातीयवादाच्या आगीत बीड एकदा होरपळून निघालंय. त्यामुळे राजकारणाची पोळी भाजण्यासाठी बीडच्या जनतेला पुन्हा या आगीत लोटणं परवडणारं नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.