parbhani, farmers  saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : जिल्हाधिका-यांच्या अहवालानंतर पाथरीचे तत्कालीन मुख्याधिकारी सेवेतून निलंबित; नेमकं काय आहे प्रकरण?

या कारवाईचा धसका गुंतवणुकदारांनी घेतला आहे.

राजेश काटकर

Parbhani News : पदाचा कालावधी संपला असताना देखील 80 हजार चौरस मीटर प्लॉटींगला मान्यता दिल्याने मुख्याधिकारी यांचे सेवेतून निलंबन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल (Collector Anchal Goyal) यांनी ही कारवाई पाथरी पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी एम.पी. वाघुंडे (Chief Executive Officer M. P. Waghunde) यांच्यावर केली आहे. (Maharashtra News)

राष्ट्रीय महामार्ग 61 लगत असल्येल्या पाथरी पालिका हद्दीतील लक्ष्मीनगर भूमापन क्रमांक सर्व्हे नं. 155 /1 आणि 155/ 2 या जागेत पाथरी पालिकेच्या तात्कालीन मुख्याधिकारी एम. पी. वाघुंडे यांनी पदाचा अतिरिक्त पदभाराचा कालावधी संपला असताना देखील बेकायदेशीररित्या जमिनीचा निवासी प्रयोजनासाठी भूमी प्लॉटिंगसाठी मंजुरी दिली.

वाघुंडे सेवेतून निलंबित

या प्रकरणाची तक्रार समोर आल्यानंतर (parbhani) जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सखोल चौकशी केली. त्यानंतर बेकायदेशीर परवानगी देणारे तात्कालीन मुख्याधिकारी एन. पी. वाघुंडे यांना सेवेतून निलंबित केले आहे.

गुंतवणुकदार चिंतेत

वाघुंडे यांनी 80 हजार चौरस मीटर जागेवर प्लाटींग परवानगी दिली होती. अनेकांनी अमाप दराने प्लाटींगची खरेदी विक्री केली. प्लाटींग बेकायदेशीर असल्याचे जाहीर झाल्याने लाखों करोडोंची गुंतवणूक करणाऱ्यांच्या चिंतेत आता भर पडली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लक्ष्मीनगर शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक आज राहणार 3 तास बंद

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोन्याचे भाव वाढले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहोचले; जाणून घ्या 24k, 22k,18k चे दर

8th Pay Commission: मोठी बातमी! ₹45 हजार किमान पेन्शन, वर्षातून 4 वेळा DA वाढीची मागणी

FSSAI pan masala rules: पान मसाल्याचे प्लास्टिक पाउच होणार बंद; FSSAIचा मोठा निर्णय

Delhi Pune Flight : दिल्ली - पुणे विमानात भयंकर घडलं! प्रवाशांची घुसमट झाली, घाम फुटला अन्...

SCROLL FOR NEXT