buldhana, rto, choice number saam tv
महाराष्ट्र

RTO Choice Number : हौसेला मोल नसतं ! चाॅईस नंबरसाठी माेजले सव्वा काेटी रुपये

आपल्या वाहनांसाठी आवडीचा नंबर आता ऑनलाईन देखील घेऊ शकता.

संजय जाधव

Buldhana RTO News : असं म्हणतात हौसेला मोल नसतं, तसंच काहीसं चित्र बुलढाणा (buldhana) जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाल आहे. गेल्या वर्षभरात बुलढानेकरांनी आपल्या वाहनाला व्हीआयपी नंबर प्लेट (choice number) असावी या हौसेपायी तब्बल सव्वा कोटी रुपये आरटीओ विभागात भरलेत. अर्थात आरटीओ विभागाला यातून मोठा महसूल मिळाला आहे. मात्र यातून बुलढानेकरही हौस करायला कुठेही मागे पुढे पाहत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल एक हजार 13 वाहनधारकांनी व्हीआयपी नंबरची मागणी केली आहे. त्यातील काही व्हीआयपी नंबर लाखाे रुपयांना दिले गेले. त्यामुळे आरटीओ (rto) विभागाला तब्बल एक कोटी 17 लाख 13 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. (Maharashtra News)

नवीन वाहने (vehicle) घेणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. नवीन गाडी घेतल्यानंतर आपल्या गाडीला आकर्षक आणि आवडीचा नंबर असावा यासाठी बुलढाणेकर आग्रही असल्याचे पाहायला मिळते. अनेकांचा अजूनही शुभ अंकांवर विश्वास आहे. त्यातून आरटीओ विभागाने जाहीर केलेल्या व्हीआयपी नंबरला दुचाकी असेल तर पाच हजार रुपयांपासून पन्नास हजार रुपयांपर्यंत हे नंबर उपलब्ध आहेत. चार चाकी वाहनांसाठी पंधरा हजारांपासून दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम एका नंबरसाठी आरटीओ विभागाकडून आकारली जाते.

त्यामुळे नवीन गाडी घेणाऱ्या ग्राहकांना जर एखादा आवडीचा नंबर हवा असेल तर तो नंबर आरटीओच्या वेबसाईटवर सहजरीत्या ग्राहकांना शोधता येतो. तो नंबर जर आरटीओ विभागाकडून पसंतीच्या क्रमांकामध्ये असेल तर त्यासाठी आरटीओ विभाग किती रुपये आकारेल याची सुद्धा माहिती आरटीओ विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

त्यामुळे आपल्या वाहनांसाठी आवडीचा नंबर मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आता ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. अगदी सहज आणि पारदर्शकपणे कुणालाही नवीन गाडी घेताना आपल्या आवडीचा नंबर आपल्या वाहनासाठी घेता येईल अशी माहिती आरटीओ अर्चना घनवट यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

Summer Vacation: शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द? मे महिन्यात शिक्षकांचे भरणार क्लास

Thursday Horoscope : जवळच्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT