Collarwali Tigress Saam Tv
महाराष्ट्र

Collarwali Tigress: ‘कॉलरवाली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघीणाचा मृत्यू

‘कॉलरवाली’ वाघीणीने ११ वर्षांत २९ बछड्यांना दिला जन्म

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - वन्यजीव प्रेमी आणि पर्यटकांसाठी एक दुःखद बातमी आहे कारण नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील राखीव वनक्षेत्रात टी-१५ तसेच ‘कॉलरवाली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघीणाचा (Tigress) वार्धक्यामुळे मृत्यू झाला आहे. ‘कॉलरवाली’ वाघीणीने ११ वर्षांत २९ बछड्यांना जन्म दिला होता. ‘सुपर मॉम’ ठरलेल्या १७ वर्षीय वाघिणीचा शनिवारी (१५ जानेवारी) संध्याकाळी पेंच (Pench) प्रकल्पातील राखीव वनक्षेत्रात वार्धक्यामुळे मृत्यू झाला. (Collarwali Tigress Who Gave Birth To 29 Cubs Dies In Madhya Pradesh)

हे देखील पहा -

'कॉलरवाली वाघिण’, ‘पेंचची राणी’ आणि ‘सुपर मॉम’ अशा वेगवेगळ्या नावाने या वाघिणीला ओळखले जायचे. तिच्या मृत्यूने वन्यप्रेमी हळहळले आहेत. या वाघीणीने २००८ ते २०१९ या ११ वर्षांमध्ये २९ बच्छड्यांना जन्म दिला. २९ बच्छड्यांपैकी २५ बछडे जिवंत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वार्धक्यामुळे अशक्त झालेली ही वाघीण १४ जानेवारीला जंगलात पर्यटकांना शेवटची दिसली.

सप्टेंबर २००५ मध्ये प्रसिद्ध वाघीण टी-७ ने चार बछड्यांना जन्म दिला होता. यापैकी एक म्हणजे ही ‘कॉलरवाली’ वाघीण. नंतर या वाघिणीने मे २००८ मध्ये तीन बछड्यांना जन्म दिला होता, पण ते जगू शकले नव्हते. त्यानंतर २३ ऑक्टोबर २०१० बछड्यांना पाच जन्म दिला होता. डिसेंबर २०१८ मध्ये शेवटच्या वेळी या वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला होता, असे एका वृत्तात नमूद केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT