नागपूरात थंडीचे पाच बळी; चौघांचा रस्त्यावर तर एकाचा ट्रकमध्ये मृत्यु Saam tv
महाराष्ट्र

नागपूरात थंडीचे पाच बळी; चौघांचा रस्त्यावर तर एकाचा ट्रकमध्ये मृत्यु

गणेशपेठ, कपील नगर, सोनेगाव परिसरात चौघांचा तर कामठी मार्गावर एकाचा थंडीनं मृत्यु झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर - शहरात यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद काल करण्यात आली आहे. काल (२१ डिसेंबर) नागपुरात तापमानाचा पारा 7.6 अंशांपर्यंत घसरला तर सोमवारी नागपूरचे तापमान 7.8 अंशावर होते. नागपूरसह विदर्भात थंडीचा कडाका सुरू आहे. हीच हाडे गोठविणारी थंडी जीवघेणी ठरत आहे. शहरातील विविध भागात थंडीचे पाच बळी गेले आहे.

हे देखील पहा -

नागपूर मधील गणेशपेठ, कपील नगर, सोनेगाव परिसरात चौघांचा तर कामठी मार्गावर एकाचा थंडीनं मृत्यु झाला आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वामन अण्णाजी सावळे हे ६५ वर्षीय वृद्ध फूटपाथवर मृतावस्थेत आढळले. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५३ वर्षीय ट्रकचालक अशोक सोनटक्के हे ट्रकमध्ये मृतावस्थेत सापडले आहेत.

याशिवाय सोनेगाव परिसरात ५४ वर्षीय उदय भुते हेसुद्धा मृतावस्थेत आदळून आले. सोनेगाव येथे ५० वर्षीय अनोळखी महिलेचा तर सदर येथीही 60 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT