Uddhav Thackeray Aurangabad Sabha Saam Tv
महाराष्ट्र

तेच शहर...तेच मैदान...पुन्हा एकदा ठाकरेंची तोफ धडाडणार

येत्या 8 जून रोजी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुद्धा औरंगाबादेत सभा होणार आहे. येत्या 8 जून रोजी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे. याच सभेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये शिवसेना नेत्यांची बैठक आयोजित करण्यात होती. (CM Uddhav Thackeray Sabha On 8 June In Aurangabad)

बैठकीला मंत्री सुभाष देसाई, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, मनीषा कायंदे यांच्यासह काही आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादेत ८ जून १९८५ रोजी स्थापन झाली. या शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनाचे औचित्यसाधून ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दोन्हीही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच राज्यात हनुमान चालीसा तसेच भोंग्यावरून राजकारण तापलं असल्याने विरोधक शिवसेनेला कोंडित पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादेत घेतलेल्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा घेतली. या सभेत त्यांनी विरोधीपक्षाच्या नेत्यांवर तोंडसुख घेतलं. इतकंच नाही तर, तर कॉंग्रेससोबत गेलो असलो तरी आम्ही हिंदुत्व विसरलो नाही असं सुद्धा त्यांनी भाजपला ठणकावून सांगितलं होतं. दुसरीकडे "काहींना बाळासाहेब ठाकरे असल्यासारखं वाटतं, मुन्नाभाई चित्रपटात कसं त्याला गांधीजी दिसतात तसं एकाला बाळासाहेब दिसतात", असा टोला नाव न घेता त्यांनी राज ठाकरेंना लगावला होता.

"शिवसेनेची सभा ही मास्टर सभा असेल"

"येत्या 8 जूनला जाहीर सभा होईल. या सभेला प्रचंड उत्सुकता आहे. सभेची पूर्वतयारी सुरू झाली असून त्यासंदर्भात बैठक झाली. ही सभा यशस्वी आणि मोठी होईल" असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना देसाई म्हणाले की, " संभाजीनगरमध्ये शिवसेनेची सभा व्हावी अशी बऱ्याच दिवसांपासून कार्यकर्त्यांची इच्छा होती. येत्या 8 जूनला संभाजीनगर शाखेचा 73 वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तेथे येऊन सभा घेतील, शिवसेनेची सभा ही मास्टर सभा असेल, सामान्य सभा नसून विशेष सभा असेल"

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT