मुंबई : आगामी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघडीसह विरोधी पक्षांनीही मोट बांधायला सुरुवात केलीय. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून पक्षवाढीसाठी सभा घेवून जनतेला संबोधित केलं जात आहे. भाजपने पोलखोल सभेच्या माध्यमातून राज्यातील मविआ सरकारवर (mva government) जोरदार हल्लाबोल केला होता. मुंबईच्या सोमय्या मैदानात भाजपने बूस्टर सभा घेत बाबरी मशिदीच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. एव्हढच नव्हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत मनसे मेळाव्यात ठाकरेंवर टीका केली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना येत्या १४ मे ला जाहीर सभा घेवून विरोधकांचा समाचार घेणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे (uddhav Thackeray) यांनी याबाबत प्रतिक्रिय दिली आहे.'गेले काही दिवस आपण माणसातच आहोत. आज मास्क काढला, पण तसा मास्क काढायचा आहे तो 14 तारखेला काढीन.' अशी खोचक टीका ठाकरे यांनी विरोधकांवर केलीय. ते मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमात बोलत होते.
महापालिकेच्या कार्यक्रमातून जनतेला संबोधित करताना ठाकरेंनी मुंबईच्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी ठाकरे म्हणाले , गेले काही दिवस आपण माणसातच आलो आहोत. आज मास्क काढला, पण तसा मास्क काढायचा आहे तो 14 तारखेला काढीन.हा मुंबई महापालिकेचा कार्यक्रम आहे, त्यामुळे राजकीय भाषण करून पाणी गढूळ करणार नाही. तसा मी मुंबईतच जन्माला आलो. पण मुंबई आता बदलत चालली आहे. निवडणूक सोडून आता फक्त एकच तिकीट सगळीकडे चालेल.बस सेवा ही आपली रक्त वाहिनी आहे.
महापालिकेच्या शाळेत शिकतो असे सांगितले की, आधी नाक मुरडलं जायचं पण आता अभिमानाने सांगण्याची वेळ आलीय. जो तहानलेला आहे त्याला पाणी देण्याचे काम आपण करत आहोत.हल्ली पर्यावरणाच्या आपण गोष्टी करतो मात्र विचारांचे प्रदूषणही होत आहे. मुंबई तुंबली की लगेच दाखवले जाते, पण हे नळाचे पाणी नाही दाखवणार.आरोग्याच्या सर्व तपासण्या आपण मोफत सुरू करणार आहोत.यावर्षी हिंदमाता परिसर तुंबणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान विरोधकांवर टीका करताना ठाकरे पुढे म्हणाले, निवडणुका आल्या की थापांचा पूर येतो.राजकारण जरूर करा पण त्यात एक दर्जा असला पाहिजे.नुसता विरोध करणे म्हणजे विरोधी नाही.सरकार चांगले काम करते. हे सांगणे ही दिलदारी आहे, पण आता ती दिसत नाही. असाही टोला ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. 14 तारखेला माझ्या मनात आहे ते मी बोलणार.
Edited By - Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.