मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने (Maharashtra government) राजकीय मैदानात शिवसेनेला मोठा धक्का दिला. एकनाथ शिंदे गटात मुंबई, लातूर, रत्नागिरी, ठाणे, मिरा भाईंदर, बदलापूरसह राज्यातील अन्य भागातील शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी सामील झाले आहेत. राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. शिंदे गटातील आमदारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत शिंदे यांचा सत्कार केला जात आहे. आमदार मंगेश कुळाडकर (Mangesh kudalkar) यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (balasaheb Thackeray) यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ठाण्यात बाळासाहेबांनी सांगायचं आणि आनंद दिघे यांनी करायचं, असं समीकरण होतं. बाळासाहेबांनी शिकवलं, शब्द देताना तो पाळला पाहिजे,असं म्हणत शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांना उजाळा दिला.
मुख्यमंत्री म्हणजे काय झेड प्लस सुरक्षा नाही. शेवटी मी बाळासाहेबांचा आणि आनंद दिघे साहेबांचा सैनिक आहे. छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी शिवसेना तयार केली. छोट्या मोठ्या केसेस अंगावर घेतला. शिवसेना-शिवसेना करतच आम्ही इथे आलो, असं म्हणत शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांना उजाळा दिला. माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी शिंदे म्हणाले, हिंदुत्वाची बाळासाहेबांची भूमिका घेतली म्हणून राज्यभरातून अनेक नगरसेवक,लोकप्रतिनिधी भेटायला येत आहेत.
मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी जिकडे गेलो तिकडे काम सुरू असते. मी वाचत बसत नाही. मी लगेच सही करतो. माझ्या जिल्ह्यात बैठक लावा, असं परवा केसरकरांनी सांगितलं होतं. मी लगेच बैठक लावली. आज तो प्रश्न मार्गी लावला. छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी शिवसेना तयार केली. छोट्या मोठ्या केसेस अंगावर घेतल्या. गेल्या अडीच वर्षात या आमदारांची किती कामं झाली ? दुसऱ्यांची कामं झाली. जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याची अस्तिवाची लढाई सुरू असते. तेव्हा करा किंवा मरा अशी परिस्थिती निर्माण होते.त्यामुळं असं करावं लागत. प्रश्न सुटणार नसतील तर अशा सत्तेचा काय उपयोग ? असा सवालही शिंदे यांनी माध्यामांशी बोलताना उपस्थित केला.
आम्हाला २० कोटी, सोबतच्यांना १०० ते ४०० कोटी द्यायचे. आम्हाला काही मिळत नसेल तर मतदारांसमोर कसं जायचं ? दोन जिल्ह्यांचा पालकमंत्री असून मी कशाला धोका पत्करला असता, सत्ता सोडून आम्ही ही भूमिका का घेतली ? कुणी काहीही टीका करुद्या, त्यावर मी बोलणार नाही. मी काम करतो. मी पैसा कमावला नाही. माणसं कमावली. माणुसकी कमावली. बाळासाहेबांचा हिंदुत्व म्हणजे सर्व जातीपातीचे विचार करून पुढे चला, असे आहे. समुद्रात जाणार पाणी मराठवाड्यात वळवण्याचे काम सरकार करणार आहे. आज आम्ही साठ हजार कोटी कर्ज काढण्याची हमी दिली. यापुढे मेट्रो शिवडी कोस्टलची कामे होतील.
१५ ऑगस्टला नागपूर शिर्डी समृद्धी महामार्ग चालू करणार. पुढील एक ते दोन वर्षात मुंबईतील रस्ते सिमेंटचे करणार. मुंबई खड्डेमुक्त झाली पाहिजे, असे निर्देश आयुक्तांना दिले आहेत. म्हाडा, वाडिया रेल्वे वसाहत, धोकादायक इमारत ही सर्व कामे झाली पाहिजेत. पंढरपूरला गेलो तेव्हा हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा होते. त्यामुळे आपण जी भूमिका घेतली आहे, ती चुकीची नाही. आपली स्वार्थासाठी भूमिका नाही. भारतीय जनता पक्षाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटलं, हे या देशाचे लढवय्ये आहेत, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.
त्यांनी मुख्यमंत्री बनवलं. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी सांगितलं, पक्षाने दिलेला आदेश आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ५० मधील एकही आमदार पडला तर मी राजकारण सोडून देईन. आमदारांच्या मतदार संघातील प्रश्नांवर काम करणार. मंगेश कुडाळकर यांना काही कमी पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.