Eknath Shinde  saam tv
महाराष्ट्र

Video | 'आम्हाला ज्यांनी वेगवेगळी नावे दिली, त्यांना...'; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर साधला निशाणा

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या विरोधकांचा खरपूस समाचार हिंगोलीतील सभेत घेतला आहे.

संदिप नागरे

हिंगोली : जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बंडखोरी करत मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या विरोधकांचा खरपूस समाचार हिंगोलीतील सभेत घेतला आहे.

'आम्हाला ज्यांनी वेगवेगळी नावे दिली, त्यांना कामामधून उत्तर देणार आहे. जिथे आम्ही जातो, तिथे मोठी गर्दी असते. हेच विरोधकांना उत्तर आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. (Eknath Shinde News )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. आज मुख्यमंत्री हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना एका आयोजित सभेत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेत पुढे म्हणाले, 'राज्यात मी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला वाचविण्याचे प्रयत्न करत आहे. त्यात आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदेंचे चेले आहेत. बांगर हे सर्व आमदारांना माझ्याकडे पाठवायचे. देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सांगितले की, 'महाराष्ट्राला पुढे न्या, आमचे केंद्र सरकार तुमच्या पाठिशी आहे'. राज्यातील हजारो कोटी रुपयांचे प्रस्ताव केंद्राला पाठविले आहेत, ते सर्व मंजूर होतील'.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीवर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ' हिंगोली जिल्ह्यात येत असताना शेतीचे भरपूर नुकसान झालं आहे. ते मी पाहिलेलं आहे. आज पर्यंत या शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे, त्या पेक्षा जास्त मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे'. निधींना मिळालेल्या मंजुरीवर मुख्यमंत्री म्हणाले, 'कळमनुरी तालुक्यातील आदिवासी भवन आणि लमाण देव याचा विकास करण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा मंजूर झाला आहे. तर औंढा नागनाथ देवस्थान विकासासाठी भरीव निधी दिली जाईल'.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT