Dombivali: हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला, पण 'हे' खपवून घेणार नाही; मनसे आमदार राजू पाटलांचा सरकारला इशारा

MNS Raju Patil On Cabinet Expansion: समर्थन दिले याचा अर्थ असा नाही की वाईट गोष्टींनाही आमचं समर्थन असेल, कोणीतरी बोलायला पाहिजे, ते आम्ही बोलतो आहोत.
MLA Raju Patil
MLA Raju Patil SaamTVNews
Published On

डोंबिवली: डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागातील रखडलेली रस्त्यांची कामे रस्त्यांची झालेली दुरावस्था याबाबत मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं आहे. राजू पाटील यांनी ट्विटरवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला होता, तर आता सरकार इशाराही दिला आहे. (Raju Patil Latest News)

हे देखील पाहा -

शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्तारावरुन (Cabinet Expansion) आज मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटद्वारे खोचक सवाल केला होता. सरकारच्या बाजूने मतदान करणारे मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या उंचावल्या आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघातील रखडलेली कामे आणि रस्त्यांची दुरावस्था याबाबत पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं आहे.

कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांवर काय बोलले मनसे आमदार राजू पाटील

एमआयडीसी भागात रस्त्यांची कामे सुरु व्हावीत. यासाठी बॅनर फाटले, उलटे लावून झाले तरी कामे अजून सुरू झाली नाहीत असा टोला त्यांनी सरकारला लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही यांना समर्थन दिले याचा अर्थ असा नाही की वाईट गोष्टींनाही आमचं समर्थन असेल, कोणीतरी बोलायला पाहिजे, ते आम्ही बोलतो आहोत. यामागे भावना कोणावर टीका करायची नाही, तर या कामांकडे लक्ष द्या अशी आहे.

जिथे कामे झालेली नसेल तिथे आम्ही बोलणारच, आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिला याचा अर्थ असा नाही की, जे चाललंय ते सर्वच आम्ही खपवून घेऊ. जिथे अन्याय दिसेल तिथे आम्ही बोलणार, आमच्या पद्धतीने मांडणार असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला दिला आहे.

MLA Raju Patil
CWG 2022 |लातूरची कन्या ज्ञानेश्वरीची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत निवड; तलवारबाजीत बर्मिंघम गाजवणार

ठाण्यातले मुख्यमंत्री असताना खड्डे भरले जावेत ही अपेक्षा - राजू पाटील

मनसे आमदार राजू पाटील पुढे म्हणाले की, पाऊस जोरात होता त्यावेळी खड्डे भरता येत नाही हे समजू शकतो. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स बनवण्याची घोषणा केली, मात्र तसे डोंबिवली-कल्याणमध्ये कुठेही झाले नाही. इथे सगळे तात्पुरते काम करून जातायत, इथे प्रशासक आहे, लोकप्रतिनिधी नाहीत. राज्यात मंत्रिमंडळ नाही, ४० दिवस झाले, दाद मागायची कुठे? ठाण्याचे मुख्यमंत्री असताना आता तरी खड्डे भरले जावेत अशी अपेक्षा आहे अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com