CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde : मी डॉक्टर नसलो तरी,मोठं ऑपरेशन केलंय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

eknath shinde on Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. मी डॉक्टर नसून मोठं ऑपरेशन केल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : विधानसभा निवडणुकीत राज्यातील काही भागात दोन्ही शिवसेनेमध्ये लढत पाहायला मिळत आहे. या दोन्ही शिवसेनेमधील लढतीने निवडणुकीची रंगत वाढली आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून सातत्याने शिंदे गटावर लक्ष्य करताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांकडूनही उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. 'मी डॉक्टर नसलो तरी,मोठं ऑपरेशन केलंय, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 'माझ्या दोन बाजूला दोन डॉक्टर बसले आहेत. मी डॉक्टर नसलो, तरी मोठं ऑपरेशन केलं आहे. डायरेक्ट टांगा पलटी घोडे फरार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी टीका केली. अंबरनाथमधील प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली.

या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा सत्तांतराचा दाखल देत उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला. तर दाताचे डॉक्टर असलेले डॉक्टर बालाजी किणीकर हे यंदा विरोधकांच्या तोंडातील दात घशात घालतील, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.

अंबरनाथमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सत्तांतराचा दाखला देत उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लगावला. तर दाताचे डॉक्टर असलेले डॉक्टर बालाजी किणीकर हे यंदा विरोधकांच्या तोंडातले दात घशात घालतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढे म्हणाले, 'ते म्हणतात पक्ष चोरला. चिन्ह चोरलं. बाप चोरला. अरे ते काय चोरायला खेळणं आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका केली. दरम्यान, अंबरनाथ विधानसभेत किणीकर यांची ठाकरे गटाचे राजेश वानखेडे यांच्याशी थेट लढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT