CM Eknath Shinde on Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

CM Eknath Shinde : 'लोकांच्या दुःखातही मुख्यमंत्रि‍पदाची खुर्ची मिळवण्याची घाई', CM एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Eknath Shinde On Uddhav Thackeray : काहींना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवण्याची घाई झाली आहे की लोकांच्या दुःखात देखील राजकीय संधी दिसते आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Sandeep Gawade

बदलापूरच्या घटनेवरून राज्यामध्ये भयंकर काहीतरी घडवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची भीती आहे. मतांसाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला जात आहे. अशा दुर्दैवी घटनांचा राजकारण करणं बंद केलं पाहिजे, मात्र काहींना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवण्याची घाई झाली आहे की लोकांच्या दुःखात देखील राजकीय संधी दिसते आहे.

महाविकास आघाडीने बदलापूर अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. हा बंद न्यायालयानेही बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. त्यावरून एकनाथ शिदें यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्र बंद काय करता? अशा प्रकारच्या बंदला परवानगी देता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. ही विरोधकांना दिलेली चपराक आहे. या दुर्दैवी घटनेचे राजकारण माझ्या बहिणी कधीही खपवून घेणार नाही हा आम्हाला विश्वास असल्याच ते म्हणाले.

लाडकी बहीण योजनेमुळे विरोधांना आता सूचायंचही बंद झालं आहे. म्हणून महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करायचा, अराजक करायचं बंदच्या नावाखाली असं कृत्य करण्याचा प्रयत्न करायचा, पण आम्ही ते होऊ देणार नाही, काही जणांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवण्याची घाई झाली आहे, त्यांना लोकांच्या दुःखात देखील राजकीय संधी दिसते असल्याचा टोला त्यांनी लगावला.

लाडकी बहीणवरू देखील विरोधक राजकारण करत आहेत. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून पोटदुखी सुरू झाली आहे. चुनावी जुमला, निवडणुकीपुरता आश्वासन असं विरोधक म्हणाले आहेत. पण आम्ही तुमचे भाऊ दिलेला शब्द पाळणारे आहोत. दोन दिवस अगोदरच पैसे खात्यात जमा होऊ लागले आहेत ज्यांच्या खात्यात आज पैसे आले नाही त्यांनी काळजी करू नका, येत्या आठवडाभरात अपात्र महिलांचे अर्ज देखील पात्र होतील आणि त्यांच्या खात्यात देखील पैसे जमा होतील, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT