CM Eknath Shinde Saam Digital
महाराष्ट्र

CM Eknath Shinde : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात पोहोचताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

CM Eknath Shinde Mahapuja : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची महापुजा होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विद्यावेतन योजनेची घोषणा केल आहे.

Sandeep Gawade

लाडकी बहीण योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात केली आहे. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार , डिप्लोमा 10 आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना 12 हजार रुपये विद्या वेतन देण्याची घोषणा केली आहे. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.

शासकीय महापुजेआधी पंढरपूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाचं उद्घाटनमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते.

अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेतून महिला वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीच मिळालं नसल्याची टीका होत होती. मात्र मुख्यमंत्र्‍यांनी आज शासकीय महापूजेचं औचित्य साधून विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार , डिप्लोमा 10 आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना 12 हजार रुपये विद्या वेतन देण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली. पण लाडक्या भावाचं काय? असा प्रश्न विचारला जात होता. त्यांच्यासाठीही आम्ही योजना सुरू केली आहे. विद्यार्थी वर्षभर कंपनीत काम करेल, त्याला अप्रेंटीस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. त्या कंपनीत तो ट्र्रेन होईल. अप्रेंटीशीपचे पैसे सरकार भरणार आहे.इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील मुलींसाठी १०० टक्के मोफत उच्च शिक्षणाची सोय आपण केल्याचंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT