cm eknath shinde appeals to manoj jarange patil on maratha reservation Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतोय; जरांगेंच्या आंदोलनाच्या आदल्या दिवशीच CM एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

CM Eknath Shinde appeals to Manoj Jarange Patil : राज्य सरकारने म्हटल्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात शोधण्याचे काम सुरू आहे. मागासवर्ग आयोग देखील नव्याने गठित केला आहे.

विश्वभूषण लिमये

CM Eknath Shinde on Maratha Reservation :

मनोज जरांगे पाटील  (Manoj Jarange Patil) मराठा बांधवांसह उद्या २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहे. मराठा बांधवांची सर्व तयारी देखील झाली आहे. मराठा आंदोलनाच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा बांधवांना मोठी अपडेट दिली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.

राज्य सरकारने म्हटल्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात शोधण्याचे काम सुरू आहे. मागासवर्ग आयोग देखील नव्याने गठित केला आहे. फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनबाबत विंडो देखील ओपन झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने अगोदरच सांगितले आहे की इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक शंभूराज देसाई

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. सगेसोयरे बाबतीत जी व्याख्या केली आहे, त्याबाबत अध्यादेश काढावा लागला तरी सरकार तयार आहे. सरकार मराठा समाजाचा विरोधात नाही, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

मुंबईचा दिशेने येणारे आंदोलन देखील स्थगित करावे, अशी विनंती शंभूराज देसाई यांनी केली आहे. मुंबईत होणाऱ्या या आंदोलनादरम्यान अनवधानाने काही माणसांमुळे परस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. जर परिस्थिती हाताबाहेर गेली, तर ती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारला प्रयत्न करावा लागेल. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्याचे आंदोलन स्थगित करावे, असं देखील देसाई म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

अचानक धनलाभ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन होणार सुरू

कोकणात ठाकरेसेनेचा उमेदवार फोडला; महाराष्ट्राच्या राजकारणात माघारीचा पॅटर्न, कोणी कुठे घेतली माघार?

लाडकींना सरकारी लाभ सोडवेना; अपात्र लाडकींनी वळवला 'या' योजनांकडे मोर्चा

SCROLL FOR NEXT