Devendra Fadnavis Saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर; १०० दिवसांचा प्लॅन ठरला

Devendra Fadnavis Meeting: विकासकामांच्या आराखड्यासंबंधित बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली होती. या बैठकीमध्ये विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Saam Tv

Devendra Fadnavis महायुती सरकारने शासकीय विभागाद्वारे १०० दिवसांत प्राधान्याने करावयाच्या विकास कामांचा आराखडा तयार करत आहे. या आराखड्याशी संबंधित बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली होती. बैठकीला प्रकल्पाशी निगडीत विभागातील पदाधिकारी उपस्थित होते. विविध विभागांच्या सचिवांनी मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आराखड्याचे सादरीकरण केले. सादरीकरणानंतर फडणवीस यांनी त्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, लोक केंद्रीत योजना, तंत्रज्ञानाचा उपयोग करुन नागरिकांना लाभ मिळवून देणाऱ्या योजना आणि राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असावा असा निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. सरकारी विभागांनी १०० दिवसांच्या आराखड्यातून ठोस कामगिरी करावी, अशी सूचनाही त्यांनी दिली आहे.

वन्य प्राणी-मानवी संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागात कृत्रिम बुद्धीमत्ता व माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाययोजना कराव्यात असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. "मानव व वन्य प्राणी यांमधील संघर्ष होत असलेल्या ठिकाणी जलद गतीने मदत मिळावी यासाठी जलद बचाव दलाची स्थापना करण्यात यावी. या दलातील अधिकाऱ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात यावे. १०० दिवसांच्या आराखड्यात यांसारख्या उपाययोजनांचा समावेश वन विभागाने करावा. बिबट्यांची वाढती संख्या पाहता त्यांची इतर राज्यातील अभयारण्यात व्यवस्था करावी. बिबटे निवारा केंद्रांची क्षमता वाढवावी", असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे "शहरातील वनीकरण वाढवण्याच्या दृष्टीने मियावॉकी वृक्षलागवड पद्धत उपयोगात आणावी. वृक्षलागवडीच्या उद्देशाने उपाययोजना कराव्यात. कृषी विभागाने आराखड्यात शेतकरी केंद्रस्थानी ठेवत योजनांची अंमलबजावणी करावी. उच्च व तंत्र विभागाने परदेशांना विद्यापीठांना आकर्षित करण्यासाठी शैक्षणिक संकुलांची निर्मिती करावी", असेही म्हटले.

आराखड्याच्या बैठकीला मुख्य सचिन सुजाता सौनिक, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह विविध विभागातील अनेक अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

SCROLL FOR NEXT