Devendra Fadnavis nagpur Visit 
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : थंडीत नागपूर तापणार... मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी नागपूरकर सज्ज, रॅली निघणार, चौकाचौकातील बॅनरने वेधले लक्ष

Devendra Fadnavis nagpur Visit : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच नागपूरमध्ये येत आहेत. नागपूरकरांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Devendra Fadnavis nagpur Visit : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचा गाडा हाकणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा नागपुरात आगमन होणार आहे. नागपूरमध्ये त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं जल्लोषात स्वागत होणार आहे. दुपारी १२ वाजता देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर शहरातील विविध चौकात त्यांचं स्वागत होईल.

देवेंद्र फडणवीस यांचं दुपारी १२ वाजता नागपूरमध्ये आगमन होणार आहे. विविध चौकात त्यांचं स्वागत होईलच. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करतील. त्यानंतर हेडगेवार स्मारक स्थळी वंदन करून रॅलीला सुरवात होईल. प्राइड हॉटेल छत्रपती शिवाजी महाराज चौक, लक्ष्मी नगर बजाज नगर शंकर नगर चौक होत लक्ष्मीभवन चौकात पोहचतील. तेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेला संबोधित करतील.

महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणीस यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा नागपुरात येत आहेत. आज त्यांच्या स्वागतासाठी नागपूर शहरातील जोरदार तयारी करण्यात आली. त्यांची ज्या मार्गाने रॅली जाणार आहे, त्या त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. तेच अधिवेशन असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही बॅनर पाहायला मिळत आहे.

प्राइड हॉटेल पासून निघालेली रॅली सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचेल. त्या ठिकाणी ग्रँड मास्टर ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स हे बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचा भलामोठा कटआऊट लक्ष वेधून घेत आहे. सध्या चौकांमध्ये सर्वत्र कमळ आणि भगवा हिरव्या रंगाचे रेलिंग लावण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय अमित शाह, एकनाथ शिंदे यांचेही बॅनर झळकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT