Devendra Fadnavis On Ajit Pawar Death Saam
महाराष्ट्र

Ajit Pawar Death: मी दिलदार मित्र गमावला, राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर: मुख्यमंत्री

Devendra Fadnavis On Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी राज्यात ३ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला.

Priya More

Summary:

  • राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनानंतर व्यक्त केले दु:ख

  • दमदार आणि दिलदार मित्र गमावला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आज विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे राज्याला मोठा धक्का बसला. त्यांच्या मृत्यूनंतर राज्यात ३ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत 'मी दमदार आणि दिलदार मित्र गमावला.', असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे.'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असेही सांगितले की, 'महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण दिवस आहे. पवार कुटुंबावर हा प्रचंड मोठा आघात आहे. अतिशय अनाकलनीय परिस्थितीत अजित पवार गेले. अजित पवारांविषयी जनसामान्यांत मोठी आस्था आहे. अजित पवार हे संघर्षशील नेता होते. जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी होते. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.'

अजित पवार यांच्या मृत्यूच्या घटनेवर विश्वास ठेवणं कठीण जातंय, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, 'महाराष्ट्राच्या विकासात अजित पवारांचं मोठं योगदान होते. राज्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. असं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. अजित पवार यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण होती. मी आणि एकनाथ शिंदे थोड्याच वेळात बारामतीला जाणार आहोत.'

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीय बारामतीकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांसह बारामतीकरांना मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखमंत्री एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार हे सगळे पुणे विमानतळावर १२:४० वाजता दाखल होतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बारामतीकडे रवाना होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Scandal: अभिनेत्रीचा स्टेडियमच्या लेडीज टॉयलेटमध्ये लपून बनवला अश्लील व्हिडिओ; ब्लॅकमेल करुन केली पैशांची मागणी

मी गेल्यावर तुझं काय? या भीतीतून थरारक कृत्य; इस्रोच्या माजी कर्मचाऱ्याने पत्नीचा गळा दाबून घेतला जीव

Hingoli : डॉक्टरचा माजोरडेपणा, अपघातात जखमी झालेल्या तरुणाच्या उपचारास नकार; हिंगोलीतील संतापजनक घटना

Maharashtra Live News Update: भिवंडी महापालिकेत भाजपने भाकरी फिरवली, थेट उमेदवार बदलला

Glowing Skin Tips: चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काय करावे?

SCROLL FOR NEXT