मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार, घोषणेकडे महाराष्ट्राचे लक्ष ! Saam Tv
महाराष्ट्र

आरक्षण मर्यादा शिथिलतेबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलवली महत्वपूर्ण बैठक

आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील चार प्रमुख पक्षांच्या संसदेतील प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : केंद्र सरकारने संसदेत घटनात्मक तरतूद करून आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील चार प्रमुख पक्षांच्या संसदेतील प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रात्री ९.३० वाजता सुरू झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेनेचे खा.अरविंद सावंत, राष्ट्रवादीचे खा.प्रफुल्ल पटेल, खा.सुप्रिया सुळे, वरिष्ठ काँग्रेस नेते खा.पी.चिदंबरम, प्रख्यात विधीज्ञ व काँग्रेसचे राज्यसभा खासदार डॉ.अभिषेक मनू सिंघवी, मुख्य सचिव सिताराम कुंटे, महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी उपस्थित आहेत.

हे देखील पहा -

मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी मागास जाती व जातीसमूह निश्चित करण्याचे अधिकार राज्यांना देताना आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची महाविकास आघाडीची मागणी आहे. या मागणीसाठी ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे शिष्टमंडळ नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ५ जुलै रोजी विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांनी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याबाबत केंद्राला शिफारस करणारा ठराव मंजूर केला होता. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी २४ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र लिहून ही मर्यादा शिथिल करण्यासाठी केंद्र सरकार व संसदेत पाठपुरावा करण्याचे आवाहन केले होते.

याच प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजची बैठक बोलावली आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे राज्यांचे हिरावलेले अधिकार पुन्हा बहाल करण्यासंदर्भात संसदेत प्रस्ताव मांडताना केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याबाबतही प्रस्ताव मांडावा आणि संसदेत या विषयावर चर्चा व्हावी, यासाठी राज्य सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार! चेंबूरमध्ये पालिका रुग्णालयाबाहेर ४ फुटांपर्यंत पाणी, रुग्णांना खांद्यावरून नेण्याची वेळ; पाहा VIDEO

Big Boss 19: 'बिग बॉस १९'च्या घरात 'गँग्स ऑफ वासेपूर'च्या अभिनेत्याची एन्ट्री; हे १२ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब

Red Carpet: फक्त सेलिब्रिटी किंवा खास लोकांचे स्वागत करण्यासाठीच रेड कार्पेट का घालतो?

SCROLL FOR NEXT