दुर्घटनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर ! SaamTv
महाराष्ट्र

दुर्घटनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर !

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तर अन्य जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाड : मागील आठवड्याभरापासून कोसळणाऱ्या पावसाने राज्यभरात हाहा:कार माजवला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसामुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्त हानी झाली आहे. एकंदरीतच संपूर्ण राज्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पूर, दरड कोसळणे आणि इतर दुर्घटनांमुळे राज्यात जवळपास १०० लोकांना जीव गमवावा लागला आहे. अनेक जण दरडीमुळे कोसळलेल्या घरांखाली व मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढले गेले आहेत. तर शेकडो जण बेपत्ता झाले आहेत. या पावसाने माणसांचा तर जीव घेतलाच सोबत मुक्या प्राण्यांना देखील आपला जीव गमवावा लागला आहे.शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड येथे भेट देऊन पूरग्रस्त परिस्थीची पाहणी केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील इतर पुरग्रस्त आणि दुर्घटनाग्रस्त जिल्ह्यांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. महाड तालुक्यातील तळिये येथील दुर्घटनेची पाहणी केली व संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यानंतर येथील गंभीर पूरस्थितीचा आढावा घेऊन या संकटाचा सामना करण्यासाठी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तर अन्य जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांसाठी उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. आपत्तीग्रस्तांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगत दुघटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.

कालच मंत्रालयातील नियंत्रण कक्षात जाऊन राज्यभरातील पुरस्थितीचा व दुर्घटनांचा आढवा मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात इतर ठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन बचाव कार्यासाठी सूचना संबंधित विभागांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

SCROLL FOR NEXT