Akola Husband -wife News saam Tv
महाराष्ट्र

Husband wife Clash: पती-पत्नीचा वाद ; न्यायालयाच्या परिसरातच पत्नी अन् सासू-सासऱ्यांनी जावयाला चोपलं

Akola Husband -wife News: अकोला न्यायालयात धक्कादायक घटना घडलीय. घटस्फोटाच्या सुनावणीसाठी आलेल्या एका व्यक्तीला सासू-सासऱ्यांनी मारहाण केल्याची घटना न्यायालयाच्या आवारात घडलीय. वकिलांच्या मध्यस्थीने जवाईची सुटका झालीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अक्षय गवळी, अकोला)

Husband wife Clash In Akola:

पत्नीला जबरदस्तीने ओढल्यामुळे संतापलेल्या सासूने जवाईवर चापटांचा वर्षाव सुरू केला. ही घटना घडलीय अकोला जिल्हा न्यायालयाच्या आवारात. सासूने चपराक लगावल्यानंतर धावून आलेल्या सासऱ्यांनीही जवाईवर बुक्क्यांचा मारा सुरू केला. शेवटी न्यायालयातील वकिलांनी मध्यस्थी करत जमिनीवर पडलेल्या जवाईला सासू-सासऱ्यांच्या तावडीतून सोडवलं. दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय.(Latest News)

पत्नी आणि सासू सासऱ्यांनी जवाईला का मारहाण केली. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊ. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून ठाकूर नामक पती-पत्नीची घटस्फोटसाठी कौटुंबिक न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज सुनावणीची तारीख होती, यासाठी दोन्ही बाजूकडील नातेवाईक न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी पतीने पत्नीला बळजबरी ओढून जवळ घेतलं तेच सासूबाईला आवडलं नाही. त्यांनी जवाईवर चापटीचा मारा सुरू केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सासूच्या मार खाऊनही जवाई काही ऐकत नव्हता. त्यावेळी मुलीचे वडील तेथे आले त्यांनी जवाईबापूवर थेट बुक्क्यांचा वर्षाव चालू केला. दरम्यान अकोला न्यायालय परिसरातच हा प्रकार घडल्याने काही काळ मोठा गोंधळ उडाला होता. वकिलांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला. परंतु यासंदर्भात मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे.

आज दुपारच्या सुमारास ठाकूर पती आणि पत्नी यांच्या दोन्हीकडचे नातेवाईक सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले. सुनावणी सुरू होण्यापूर्वीच दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की थेट सासू आणि सासर्‍याला जावयावर हात उचलावा लागलाय. या घटनेने अकोला न्यायालयासह परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोघांनी एकमेकांविरुद्ध परस्पर रामदास पेठ पोलिसांनी तक्रारी दाखल केल्या. पोलिसांनी दोघांचे म्हणणे ऐकले असून नोंद घेतली असू पुढील तपास सुरू आहे.

सासऱ्याला काठीने बेदम मारहाण

सासरा अन् सुनेचं नात बापलेकीसारखं असतं असं म्हणलं जातं. पण कर्नाटकमधून सासरा- सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडलीय. कर्नाटकच्या मंगळुरुमध्ये सुनेने आपल्या पित्यासमान सासऱ्याला घराचा दरवाजा लावून काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये राहणारी महिला उमाशंकर ही विद्युत मंडळात काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी या महिलेने आपल्या वृद्ध सासऱ्याला बेदम मारहाण केल्याची तक्रार नजिकच्या कनकनडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : नगराध्यक्षांपाठोपाठ आता नगरसेवकांचेही ठरले; काहींचे गणित जमले तर काहींचे बिघडले

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

SCROLL FOR NEXT