Chhatrapati Sambhajinagar Bidkin News  Saam TV
महाराष्ट्र

Sambhaji Nagar News: चिकू दाबल्यानं दोन गटात तुफान हाणामारी, एकमेकांवर दगड-वीटांचा मारा; १७ जणांविरोधात गुन्हा

Satish Daud

Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिकू खरेदी करताना दाबून पाहिल्याने तो फुटला यावरून दुकानदार आणि ग्राहकामध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगड विटांचा मारा केला. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटातील १७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एखाद्या सिनेमाच्या कथेलाही लाजवेल, असा हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhajinagar) बिडकीन तालुक्यात घडला आहे. विशेष म्हणजे परिसरात निर्माण झालेल्या तणावाची परिस्थिती पाहता अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवावी लागली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बिडकीन बसस्टँड परिसरात एका फळविकेत्याने फळाचे दुकान लावले होते. यावेळी परिसरातील एक ग्राहक त्याच्याकडे चिकू खरेदी करण्यासाठी आला. दरम्यान, चिकू खरेदी करताना तो ग्राहकाने दाबून बघितला. त्याचवेळी चिकू फुटल्याने फळविक्रेत्याला राग अनावर झाला. (Latest Marathi News)

दोघांमध्ये सुरुवातीला बाचाबाची सुरू होती. काही वेळातच या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, दोन्ही गटातील लोक आमने-सामने आले. यावेळी एकमेकांवर दगड-वीटांचा मारा करण्यात आला. या घटनेत पाच ते सहा जण जखमी झाले.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरी देखील दोन्ही गटातील लोक एकमेकांना शिवीगाळ करीत मारहाण करीत होते.

अखेर पोलिसांना अतिरिक्त कुमक मागवावी लागली. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील तब्बल १७ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT