Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: परळच्या शिरोडकर हायस्कूलच्या ताब्यावरून दोन व्यवस्थापन गटांत वाद; शाळेला कुलूप

Marathi Breaking Live Headlines Updates : नवरात्रौउत्सव २०२६ पहिला दिवस, घटस्थापना, सीजीपी दिल्ली आंदोलन, अभिजित दीपके, ध्रुव राठी, अजिंक्य शिंदे, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, राज्यातील हवामान, महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

संजय राऊतांचा दावा; मार्चपर्यंत मोदी सत्तेत राहणार नाहीत

दिल्लीतील सीजेपी आंदोलनावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. हा विषय केवळ सीजेपीपुरता मर्यादित नसून देशातील लोकशाहीशी संबंधित असल्याचे त्यांनी म्हटले. आंदोलन अद्याप थांबलेले नसून माजी मुख्यमंत्री आणि खासदारांना ताब्यात घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

देशात ‘डिटेन्शन राज्य’ आणि ‘पोलीस राज्य’ निर्माण झाले असून, देशात आणीबाणी लागू असल्याचे मान्य केले पाहिजे, असे राऊत म्हणाले. हिटलरने आपल्या अखेरच्या काळात अशाच प्रकारची कृती केल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. भाजपमध्येही अंतर्गत असंतोष दिसू लागल्याचा दावा करत, मार्चपर्यंत नरेंद्र मोदी सत्तेत राहणार नाहीत, असे भाकीत संजय राऊत यांनी केले.

परळच्या शिरोडकर हायस्कूलच्या ताब्यावरून दोन व्यवस्थापन गटांत वाद; शाळेला कुलूप

परळ येथील शिरोडकर हायस्कूलचा ताबा मिळवण्यावरून दोन व्यवस्थापन गटांमध्ये वाद सुरू झाला आहे. यापैकी एका गटाने शाळेला कुलूप लावल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती लक्षात घेता शाळेच्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या प्रकरणी विद्यमान संस्थाचालक भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. दरम्यान, व्यवस्थापनातील या वादामुळे शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अभिजीत दिपकेंसह सीजेपीच्या तिन्ही नेत्यांची सुटका

CJP च्या अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांची सुटका केली

Delhi Police : दिल्ली पोलिसांची आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याच्या हालचाली?

दिल्ली पोलिसांची आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याच्या हालचाली?

पोलिसांकडून माध्यमकर्मी यांना आंदोलकांच्या गर्दीत घुसू नये, अशा सूचना

गर्दीपासून सुरक्षित अंतर राखून coverage करण्याच आवाहन

आंदोलकांना हाताळताना पोलिसांना अडथळा निर्माण होऊ शकते असा पोलिसांचा दावा

Amit Satam : भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना मातृ शोक

भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना मातृ शोक

अमित साटम यांच्या आईचे दीर्घ आजाराने निधन

शितल साटम यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन

लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी

मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मंदिरात रीघ लागली असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे

भंडाऱ्यात शासकीय धान गोडाऊनमधील तांदळाची चोरी

भंडाऱ्यात शासकीय धान गोडाऊनमधील तांदळाची चोरी

पवनी पोलिसांनी केली धान व्यापाऱ्यासह ५ आरोपींना अटक

मुंबईच्या वडाळा पूर्व गणेश नगर येथे रात्री उशिरा मोठा अपघात

मुंबईच्या वडाळा पूर्व गणेश नगर येथे रात्रि उशिरा मोठा अपघात

गणेश नगरच्या सिग्नलवर एका महिलेला ट्रकने चिरडला

सदर ठिकाणी पीडित महिलेचा जागीच मृत्यू

नवरात्र उत्सवानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये घटस्थापनेला सुरुवात

नवरात्र उत्सवानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये घटस्थापनेला सुरुवात

देवीची तोफ उडवून घटस्थापनेची होते सुरुवात

सकाळपासूनच देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी

अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजार केले जाणार

अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजार केले जाणार

सकाळी ९ वाजता दिल्ली कँट पोलीस ठाण्यात कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार

CJP च्या कायदा विभागाच्या प्रमुख हेड रत्ना सिंह यांची माहिती

दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने आज सकाळी याबाबत माहिती दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Washim : तुरीच्या दरात पुन्हा तेजी;वाशिम,कारंजा बाजार समितीत तुरीला १० हजार ७०० रुपयांचा दर

वाशिम जिल्ह्यात तुरीच्या दरात पुन्हा तेजी आली असून, वाशिम आणि कारंजा बाजार समितीत तुरीला १० हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे.

मात्र, परतीचा पाऊस न झाल्याने आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने आगामी काळात तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

Nagpur : नागपूर शहरातील धार्मिक स्थळांना मालमत्ता करातून सूट देण्याची आमदार विकास ठाकरे यांची मागणी

- नागपूर शहरातील धार्मिक स्थळांना मालमत्ता करातून सूट देण्याची आमदार विकास ठाकरे यांची मागणी

- मंदिरे, बौद्ध विहार, मशिदी, दर्गाह, चर्च, गुरुद्वारे आणि सर्व धार्मिक स्थळांना मालमत्ता करातून सूट देण्याची मागणी विकास ठाकरे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे

CJP Mumbai Protest Update : कॉक्रोच जनता पार्टीची मुंबईतही आंदोलनाची हाक

कॉक्रोच जनता पार्टीची मुंबईतही आंदोलनाची हाक

आज शिवाजी पार्कवर दुपारी चार वाजता सीजेपीच आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा 'निरोप समारंभ' साजरा केला जाणार

महाराष्ट्र सीजेपी कडून आंदोलनाची हाक

दिल्लीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही सीजेपीच आंदोलन

आंतरराष्ट्रीय बाल लैंगिक शोषण प्रकरणात पुण्यातील तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांचा तुरुंगवास

आंतरराष्ट्रीय बाल लैंगिक शोषण प्रकरणात पुण्यातील तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांचा तुरुंगवास

अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडातील अल्पवयीन मुलांचे शोषण

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्यात सहभागी असल्याप्रकरणी भारतीय तरुण रोहन राणे याला फ्रान्समधील न्यायालयाने सुनावला २० वर्षांच्या कारावास

आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात

आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात...

अमरावतीचे आराध्य दैवत असलेल्या अंबा देवीच्या मंदिराला आणि एकवीरा देवीच्या मंदिराला आकर्षक रोषनाई...

नऊ दिवसात लाखो भाविक दर्शनासाठी येणार

आचारसंहितेत अडकला दिवाळीचा बोनस

आचारसंहितेत अडकला दिवाळीचा बोनस

निवडणूक आयोगाच्या परवानगीसाठी प्रयत्न

दिवाळी जवळ आली असतानाही पुणे महापालिका आणि पीएमपीच्या कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबत निर्णय झालेला नसल्याने अस्वस्थता वाढली

अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात खाद्यतेलावर धडक कारवाई

अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात खाद्यतेलावर धडक कारवाई

पुणे विभागातील ५ जिल्ह्यांत २५ आस्थापनांची तपासणी करून एकूण १ कोटी २८ लाख ७३ हजार रुपये किमतीचे ७४ हजार ६१२ किलो खाद्यतेल जप्त

पुणे विभागात खाद्यतेल उत्पादक व विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम

एफ डी ए च्या पुणे विभागातील विविध जिल्ह्यात २५ ठिकाणी धाडी

पुण्यातील एम पी एस सी विद्यार्थ्यांचे आंदोलन! अध्यक्षांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीचा प्रस्ताव

पुण्यातील एम पी एस सी विद्यार्थ्यांचे आंदोलन! अध्यक्षांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीचा प्रस्ताव

आंदोलनाच्या तोडग्यासाठी वाटाघाटींना वेग

दिल्लीतील आंदोलनानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत

- दिल्लीतील आंदोलनानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत

- मेट्रो स्थानकांवरील बंद प्रवेशद्वारे पुन्हा खुली

- रेल्वे सेवा नियमित करण्याच्या दिशेने हालचाली

- आंदोलनामुळे बंद केलेल्या सेवा पुन्हा सुरू

- मात्र मध्य दिल्लीतील ३० ठिकाणी वाहतूक वळवण्याची शक्यता

- जंतरमंतर, संसद मार्ग आणि कनॉट प्लेस परिसरावर पोलिसांचं लक्ष

- आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त कायम

- नागरिकांना प्रवासापूर्वी वाहतूक स्थिती तपासण्याचे पोलिसांचे आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2026 : नवरात्रीचे ९ दिवस, ९ देवी अन् ९ खास नैवेद्य; पाहा कोणत्या दिवशी काय प्रसाद दाखवावा

Delhi CJP Protest : भाजप नेत्याच्या मुलीला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात; कारण आलं समोर

How to clean a microwave: किचनमधील मायक्रोवेव्ह कसा साफ करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

CJP Protest: मोठी बातमी! अभिजीत दीपकेसह सीजेपीच्या तिन्ही नेत्यांची सुटका, आंदोलनाचं पुढे काय होणार?

Health Care : सतत तासनतास एकाच जागी बसून काम करता? 'ही' ६ लक्षणे देतायत गंभीर आजारांचा इशारा

SCROLL FOR NEXT