CJP founder Abhijit Deepke faces opposition from the Police Boys organisation following a reported incident involving a police sub-inspector. saam tv
महाराष्ट्र

अभिजीत दीपकेंच्या अडचणी वाढल्या; 'बॉईज' करणार CJPसंस्थापकाच्या विरोधात आंदोलन, नेमकं प्रकरण काय?

Abhijeet Dipke in Trouble : अभिजीत दीपके यांच्या विरोधात बीडमधील पोलीस बॉईज संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. पोलीस उपनिरीक्षकासोबत झालेल्या कथित वादानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. पोलीस अधिकाऱ्याला घराबाहेर काढतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Bharat Jadhav

  • दीपके यांच्या विरोधात बीडमधील पोलीस बॉईज संघटनेने आंदोलनाचा इशारा

  • पोलीस उपनिरीक्षकासोबत झालेल्या कथित घटनेनंतर दीपके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

  • दीपके यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला नाव आणि पद विचारल्याचा उल्लेख

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

देशातील विद्यार्थ्यांचा आवाज बनलेल्या आणि नीट पेपरफुटीवरून सरकारला धारेवर धरणाऱ्या अभिजीत दीपके अडचणीत येण्याची शक्यता आहे. देशातील तरुणांसाठी हक्काची लढाई लढणाऱ्या दीपकेविरोधातच बीडमधील पोलीस बॉईज संघटनेनं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. पोलीस बॉईज संघटनेने आंदोलनाचा इशारा का दिलाय? नेमकं प्रकरण काय हे जाणून घेऊ.

एक-दोन दिवसापुर्वी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी एका पोलीस उपनिरीक्षकाला थेट आपल्या घराबाहेर काढलं होतं. पोलीस अधिकाऱ्याला त्यांचं नाव काय, पद काय असं विचारत दीपकेंनी त्या पोलीस अधिकाऱ्याला घराबाहेर काढलं होतं. त्याचमुळे आता अभिजीत दीपके अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर थांबलेल्या पोलीस अधिकाऱ्याला घराच्या आवारातून बाहेर काढलं होतं. त्यावरून आता पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे. अभिजीत दीपके यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरून माफी मागावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी दिलाय.

पोलीस हे त्यांच्या संरक्षणासाठीच काम करत आहेत. ती जबाबदारी पोलिसांची आहे.. आपले कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्याला अशा पद्धतीने अवमानित करणे चुकीचे आहे. या प्रश्नावर आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत त्यांचे पोलीस संरक्षण काढण्याची देखील मागणी करणार असल्याचे पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी केली आहे.

अभिजीत दीपके यांनी सोमवारपर्यंत पोलीस अधिकाऱ्याची माफी मागावी. जर दीपके यांनी माफी मागितली नाहीतर नाईलाजाने पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाला समोर चक्काजाम आंदोलन करावे लागेल. हा महाराष्ट्र लोकशाहीने चालणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा आहे. ज्याच्या पाठिशी संरक्षण करणारा असतो त्याचा सन्मान केला पाहिजे.

ही छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आहे. पण आपण दिल्लीच्या पोलिसांना मारलं. महाराष्ट्र पोलीस काय चिल्लर आहेत असं वाटत असेल तर हे येथे चालणार नाही. असा अंहकार आला असेल तर आम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या पाठिशी आहोत. सीजेपीच्या एका कार्यकर्त्याने मला फोन करून धमकी दिली. पण त्यांना मी शांत शब्दात सांगतिलं की, तुम्ही ज्या पोलीस अधिकाऱ्याचा अपमान केला, त्यांचे पाय धरून माफी मागावी, अशी मागणी दुबाले यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी झाला मुळशीकर, पुण्यात खरेदी केली ५ एकर जमीन, तब्बल ‘इतक्या’ कोटीत

Maharashtra News Live Update: बाभुळगांव वरून आंदोलक विद्यार्थी अमरावतीसाठी रवाना

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

SCROLL FOR NEXT