CJP VS BAR COUNCIL: LAW STUDENTS RESTRICTIONS WITHDRAWN saam tv
महाराष्ट्र

CJPचा मोर्चा आता बार काऊन्सिलकडे, LAW च्या विद्यार्थ्यांवरील निर्बंध बारकडून मागे

CJP Protest Against Bar Council Of India Restrictions On Law Students: कॉक्रोच जनता पार्टीनं जंतरमंतर गाजवल्यानंतर आता आपला मोर्चा वळवलाय तो बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडे. हैदराबादच्या एक विद्यापीठातल्या लॉच्या विद्यार्थ्यांवर घातलेले निर्बंध बार काऊन्सिलच्या कसे अंगाशी आले आणि सरन्यायाधीशही त्यांच्यावर कार बसरले? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये...

Saam Tv

कॉक्रोच जनता पार्टीच्या एका इशाऱ्यात बार कौन्सिलनं स्वताचंच हसं करुन घेतलं. मोदी सरकारच्या मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर सीजेपीनं बार कौन्सिलला एक इशारा दिला आणि बार कौन्सिलला आपल्याच निर्णय रद्द करण्याची नामुष्की ओढावली.

विशेष म्हणजे ज्या सरन्यायाधीशांना विरोध केल्यामुळे हे प्रकरण वाढलं त्याच सरन्यायाधीशांनीही बार काऊन्सिलला कडक शब्दात फटकारलंय.

सरन्यायाधीशांनी बार काऊन्सिलला सुनावलं

नालसार विद्यापीठातील विद्यार्थी आणि माझ्यातील ही वैयक्तिक बाब

विद्यार्थ्यांना शांततापूर्ण मार्गाने विरोध करण्याचा पूर्ण अधिकार

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात बार काऊन्सिल ऑफ इंडियाचा संबंध नाही

विद्यार्थी किंवा प्राध्यापकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये

विद्यार्थ्यांना विरोध करण्याचे कारण असेल, तर BCIचा यात संबंध नाही

बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार हे गेल्या 12 वर्षांपासून त्या पदावर आहेत. या काळात त्यांनी दौऱ्यावर केलेल्या कोट्यावधींच्या खर्चाचा हिशोब सीजेपीनं मागितल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसतंय. त्यात मनन कुमार हे भाजपचे खासदारही आहेत त्यामुळे आता पुन्हा सीजेपी विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. मात्र सीजेपीच्या या आंदोलनाला यश आल्यामुळे त्यांचा हा दुसरा विजय मानला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT