citizens protest against solapur muncipal corporation saam tv
महाराष्ट्र

Solapur : किडवाई ते बारा इमाम चौकातील नवीन रस्ता 10 दिवसांतच खोदला; नागरिकांनी खड्ड्यांची पूजा करून रस्त्याला घातला हार

या दरम्यान,त्या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन कट झाल्याने त्या नागरिकांची मोठी अडचण झाली. मात्र ,रस्ता पूर्ण झाल्यानंतरही पाण्याची गैरसोयच सुरू झाली.

विश्वभूषण लिमये

Solapur :

सोलापुर शहरातील किडवाई चौक ते बारा इमाम चौका या मार्गावरील रस्ता खराब झाल्याने काही दिवसांपूर्वीच नवा करण्यात आला. अवघ्या दहा दिवसातच या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. काही नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यास पुष्पहार घालून पूजा करीत आंदोलन छेडले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किडवाई चौक ते बारा इमाम चौकातील रस्ता केंद्र शासन प्रस्तुत राष्ट्रीय स्वच्छ वायू योजनेअंतर्गत २०२३-२४ कालावधीमध्ये ६३ लाख ९८ हजार ३६३ रुपये निधी मंजूर होऊन रस्ता दहा ते पंधरा दिवसांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आला होता. (Maharashtra News)

यासाठी जवळपास दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला होता. या दरम्यान,त्या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन कट झाल्याने त्या नागरिकांची मोठी अडचण झाली. मात्र ,रस्ता पूर्ण झाल्यानंतरही पाण्याची गैरसोयच सुरू झाली. यामुळे जेव्हा नागरिकांनी याबाबतची तक्रार केली. तेव्हा प्रशासनाने काही दिवसांपर्वीच तयार केलेला रस्ता पुन्हा खोदला. यामुळे पुन्हा नागरिकांना खड्डामय रस्त्याचा अनुभव घ्यावा लागत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलंय? रोज नाश्त्याला खा 'हा' १ पदार्थ, हार्ट अटॅकचा धोकाही टळेल

Dhaba Style Dal Tadka Recipe: घरच्या घरी बनवा ढाबा स्टाइल तूर डाळ तडका, वाचा सोपी रेसिपी

Hair Care: शॉवरनंतर केसांची अशी घ्या काळजी; ओले केस गळणे आणि तुटणे होईल कमी

Maharashtra News Live Update: हिंगोलीत पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Blood Sugar Control Milk: ब्लड शुगर कंट्रोलसाठी 4 प्रकारचे दूध आहेत सर्वात बेस्ट; डायबिटीजच्या रुग्णांनी कोणते दूध प्यावे?

SCROLL FOR NEXT