Beed : पेपरफुटी प्रकरणातले 'ते' मंगल कार्यालय कोणतं ? पोलिसांनी जाहीर करावं... SaamTV
महाराष्ट्र

Beed : पेपरफुटी प्रकरणातले 'ते' मंगल कार्यालय कोणतं ? पोलिसांनी जाहीर करावं...

बीड शहरातील नगर रोडवरील एका मंगल कार्यालयात पेपर फुटीची शाळा घेतल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र अद्याप बीडमधील ते मंगल कार्यालय कोणता आहे ? हे जाहीर करण्याची मागणी आता केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड : आरोग्य भरती पेपरफुटी (Health Recruitment Paper) प्रकरणांमध्ये बीडच्या संजय सानप याला पोलिसांनी अटक केली आहे. या संजय सानप याने बीड (Beed) शहरातील नगर रोडवरील एका मंगल कार्यालयात पेपर फुटीची शाळा घेतल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र अद्याप बीडमधील ते मंगल कार्यालय कोणता आहे ? नेमकं मंगल कार्यालयमध्ये आणखीन काय घडलं ? त्या मंगल कार्यालय चालकाचं आणि सानप याचं साटलोट आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान ज्या मंगल कार्यालयात असा प्रकार घडला आहे, ते एकदम चुकीचं आहे. त्याचा तपास पोलिसांनी करावाच. मात्र आम्ही ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला मंगल कार्यालय देतो, त्यावेळेस तो मंगल कार्यालयमध्ये काय करतो ? हे आम्हाला माहीत नसतं. कारण जर त्याने पेपरफुटी (PaperLeak) विषयी काही माहिती दिली असेल, तर ते अगदी कमी वेळात दिली असेल. तेवढ्या वेळात त्यांनी कशाची बैठक घेतली, काय माहिती दिली, हे आमच्या सारख्या मंगल कार्यालय चालकांना कसं माहित होणार ? असा देखील सवाल मंगल कार्यालय चालक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी उपस्थित केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई किती कोटींचा मालक?

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

SCROLL FOR NEXT