citizens criticize municipal corporation on dengue outbreak in miraj File Photo
महाराष्ट्र

Sangli : सांगली जिल्हा भाजप वाहतूक सेनेच्या उपाध्यक्षांचा डेंग्यूने घेतला बळी, नागरिकांचा महापालिकेवर राेष

सध्या मिरज शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

विजय पाटील

Sangli News :

सांगली जिल्ह्यात एकाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर नागरिकांनी महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे डेंग्यू वाढत असल्याचे म्हटले. तसेच रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे रुग्णांचा बळी जात असल्याचा आरोप नागरिकांनी साम टीव्हीशी बाेलताना केला. (Maharashtra News)

मिरजेत हबीब शेख यांचा डेंग्यूने दुर्दैवी मृत्यू झाला. गेले पंधरा दिवस त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. हबीब शेख भाजपच्या सांगली जिल्हा वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष म्हणून सक्रिय होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सध्या मिरज शहरात डेंग्यू साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. सुमारे 20 रुग्ण डेंग्यूचे आढळले आहेत. त्यामध्ये 8 वर्षाच्या बालकाचा ही समावेश आहे. हे रुग्ण सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत.

महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे हबीब शेख यांचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांनी साम टीव्हीशी बाेलताना केलाे. मिरज शासकीय रुग्णालयात अस्वच्छता असल्याने त्या ठिकाणी स्वच्छ्ता मोहीम राबवणे आवश्यक असल्याचे म्हटले.

या ठिकाणी उपाचारासाठी दाखल असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य सुरक्षित राहील याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. तसेच वेळेत कचरा उचलला जात नसल्याने स्वछतेचा शहरात बोजवारा उडाला असल्याने नागरिकांनी महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साथीच्या आजारावर उपाययोजना करण्यासाठी डास प्रतिबंधक औषधे फवारणी करण्याची मागणी अजगर शरीक मसलत यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT