aurangabad, police, youth, exam saam tv
महाराष्ट्र

Central Armed Forces Exam : नऊ लाखांत डमी म्हणून बसला, सशस्त्र दलाच्या परीक्षेतील प्रकार, दाेघे अटकेत

पाेलिसांनी अविनाशची झडती घेतली. त्याच्याकडे माैल्यवान साहित्य आढळले.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Aurangabad : केंद्रीय सशस्त्र दलाच्या परिक्षेसाठी (exam) नऊ लाख रुपये घेऊन डमी उमेदवार बनून गेलेला युवक (youth) सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे सापडला. त्यामुळे युवकासह मूळ परिक्षार्थी या दाेघांना औरंगाबाद पाेलिसांनी (police) ताब्यात घेतलं. (Maharashtra News)

केंद्रीय सशस्त्र दलाची परीक्षा औरंगाबाद येथे हाेते. या परिक्षेसाठी अविनाश सजन गोमलाडू असे या युवकाने विकास शाहूबा शेळके याच्या नावावर जाऊन डमी विद्यार्थी म्हणून परीक्षेसाठी बसण्याचा प्रयत्न केला.

सुरक्षारक्षकाने परीक्षेदरम्यान हॉलमध्ये अंगझडती घेतली. त्यामुळे अविनाश सजन गोमलाडू याचे बिंग फुटले. दाेघांना पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पाेलिसांनी अविनाशची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे ४ हजार रुपये किमतीचे एटीएम ट्रान्समीटर, ब्लूटुथ डिव्हाईस, ईअर फोन, मोबाइल आढळून आला.

त्याशिवाय मूळ उमेदवाराची कागदपत्रेही अविनाशकडे सापडली. हायटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो बाहेरुन प्रश्नाची उत्तरे मागविणार होता अशी माहिती (aurangabad) एमआयडीसी सिडको पोलीसांनी दिली. दाेघांवर ही गुन्हा नाेंदविण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या तरुणाला अटक

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT