पुणे : राज्यात महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची ताकद असताना, 'अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणताय, आरे एकट्यानेच तुमच्या तिघांचाही धूर काढलाय, आता तिघांनाही समजलय अकेला देवेंद्र काय काय करतोय.' असं म्हणत भाजपनेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
राज्यसभेच्या (RajyaSabha) दोन जागा तर येणारच, मात्र तिसरी जागाही सहज निवडून येणार असा विश्वास चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त केला. त्या आज शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे यांनी महिला मेळाव्यात बोलत होत्या.
हे देखील पाहा -
त्या पुढे म्हणाल्या, 'राज्यात सरकारी दवाखान्यात सामान्य नागरिक जाण्यासाठी घाबरतोय, राज्यात मोठे नेतेही सरकारी दवाखान्यांवर विश्वास ठेवत नाहीत तर गोरगरीबांनी तरी कसा विश्वास ठेवायचा. कोरोना काळात राज्यातील नेत्यांनी खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले या नेत्यांची बिलही समोर आली आहेत, त्यामुळे सरकारी दवाखान्याच्या या अवस्थेवर राज्यातील मंत्रीच विश्वास ठेवत नाहीत तर राज्यातील गोरगरीब जनता कसा ठेवणार' असही त्या म्हणाल्या.
आघाडीची गोडी कडू -
पुढचा मुख्यमंत्री आमचाच म्हणणाऱ्या राज्यातील तीन पक्षांच्या आघाडीची गोडी कडु झाली आहे. मात्र, सत्तेसाठी आणि भाजपाला दुर ठेवण्यासाठी ही गोडी घेत आहेत. राज्यात ऐवढे गंभीर प्रश्न असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमचा पुढचा मुख्यमंत्री कोन? याची स्वप्न पडतात, ही बाब दुदैवी आणि लाजीरवाणी आहे. असं म्हणत वाघ यांनी मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य करणाऱ्यां राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली.
Edited By - Jagdish patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.