uday samant, prashant yadav, chiplun, congress, kokan political news saam tv
महाराष्ट्र

Kokan Political News : काॅंग्रेसच्या भावी आमदारालाच उदय सामंतांनी पळविलं ? राजीनाम्याने चर्चेला उधाण

काेकणातील बहुतांश राजकीय कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करीत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- जितेश कोळी

Kokan Political News : चिपळूण काँग्रेसचे (chiplun congress) तालुका अध्यक्ष प्रशांत यादव (prashant yadav) यांनी तालुका काँग्रेस अध्यक्षपदाचा आज (बुधवार) तडकाफडकी राजीनामा (resign) दिला आहे. काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) गटात प्रवेश केल्यानंतर आता लगेचच तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी राजीनामा दिल्याने (chiplun latest news) उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे.

काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून प्रशांत यादव यांच्या नावाची शहरात चर्चा होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना प्रशांत यादव यांना दिलेली ऑफर त्यांनी खरोखर स्वीकारली की काय अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झालेली आहे.

प्रशांत यादव यांच्या राजीनाम्यामुळे रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आजच काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे यादव यांच्याबाबत उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे.

दरम्यान राजीनामा दिल्यानंतर प्रशांत यादव हे नॉट रीचेबल झाले आहेत. आता प्रशांत यादव हे देखील शिंदे गटात सामील होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खोपोली नगर परिषदेचा अनागोंदी कारभार उघड, 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे अर्धनग्न आंदोलन

Chandrapur Politics: वडेट्टीवार आणि धानोरकर वाद शिगेला,18 नगरसेवक दिल्लीला; महापौरपदाबाबत अंतिम निर्णय घेणार राहुल गांधी?

Wednesday Horoscope : काही तरी मोठं घबाड हाती लागणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब सुसाट धावणार

कोण राज ठाकरे- वाकरे...; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरील टीकेनंतर प्रफुल पटेल भडकले, VIDEO

Valentine's Day Gifts: व्हॅलेंटाईन डे करा स्पेशल यावेळी तुमच्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला द्या या युनिक गिफ्ट्स

SCROLL FOR NEXT