chiplun, bhaskar jadhav saam tv
महाराष्ट्र

Bhaskar Jadhav : आमदार भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला प्रकरणी पाेलिसांचा माेठा दावा; 'त्यांची' चाैकशी पूर्ण

श्वान पथक अवघ्या पन्नास मीटरवर घुटमळले​.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश काेळी

Bhaskar Jadhav News : आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या घरावरील हल्ला प्रकरणात आठ संशयितांची पाेलिसांनी कसून चोकशी केली. या सर्वांना चिपळूण पोलिसांनी चाैकशी करून सोडून दिले आहे. या घटनेचा तपास सात पथकांच्या माध्यमातून जोमाने सुरू आहे. (Bhaskar Jadhav Latest Marathi News)

आमदार भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्याप्रकरणी पोलिसांच्या तपासला वेग आला आहे. आत्तापर्यंत आठ जणांची पोलिसांनी चौकशी केली आहे. घटनास्थळावर संशियत आरोपींचा मागोवा घेण्यासाठी पाचारण करण्यात आलेले श्वान पथकही अवघ्या पन्नास मीटरवर घुटमळले​.

दरम्यान अद्याप कोणत्याही संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. या हल्ल्यात वापरले गेलेले सहित्य कोठून आले हे तपासले जात आहे. तसेच जाधव यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. मात्र दाेनशे मीटर परिसरात असणा-या सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून पाेलिस संशयितांचा तपास घेत आहेत. (Breaking Marathi News)

आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर ज्या ठिकाणी हल्ला झाला. तेथे पेट्रोलने भरलेली बाटली सापडली हाेती. त्यामुळे पाेलिस पेट्रोल पंप येथील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून तपास सुरु आहे.

या प्रकरणी काही भाजपा पदाधिकारी यांची सुध्दा चाैकशी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई व चार उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूणात (chiplun) फाैज फाट्यासह तपासासाठी ठाण मांडून आहे. येत्या दोन दिवसांत सत्य बाहेर येईल असा दावा पोलिसांनी केला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT