Parbhani: 39°C तापमानात बालकामगारांचे काबाडकष्ट... राजेश काटकर
महाराष्ट्र

Parbhani: 39°C तापमानात बालकामगारांचे काबाडकष्ट; रेल्वे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष...

Child Labor News: दक्षिण-मध्य रेल्वे गुत्तेदाराकडून बाल कामगारांकडून सर्रासपणे घेतले जाते काम; 39°C तापमानात लहान मुले करातायेत रेल्वेरुळावरील गिट्टी पसरवन्यासह इतर कामे.

राजेश काटकर

परभणी: दक्षिण-मध्य रेल्वेच्या (South-Central Railway) होत असलेल्या जुनी पटरी बदलण्याच्या कामात रेल्वे गुत्तेदाराने चक्क बालकामगारांना (Child Labour) रेल्वेच्या कामात लावले असून हे बालकामगार 39°C अंश सेल्सिअस एवढ्या प्रचंड तापमानात रेल्वे पटरीवर विविध कामे करत असून रेल्वेच्या प्रवाश्यांनी हया गुत्तेदारावर कारवाईची मागणी केली आहे. (Child labours are working at a temperature of 39 degrees Celsius; But the railway administration neglected)

हे देखील पहा -

दक्षिण-मध्य रेल्वेकडून करण्यात येत असलेल्या कामात रेल्वे कंत्राटदार चक्क बालकामगारांकडून 39°C अंश सेल्सिअस तापमानात बालकामगारांकडून काम करून घेत असल्याचा प्रकार समोर आलाय. परभणी (Parbhani) जिल्हातील मानवतरोड येथील रेल्वेस्थानकात नांदेड- मनमाड ते या मार्गावर जुनी पटरी बदलण्याचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी कंत्राटदाराने मध्यप्रदेश येथील कामगार आणले आहेत. हे कामगार रेल्वेच्या उड्डाणपूलाखाली कोप्या करून राहत आहेत. शोकांतिका म्हणजे संबंधित कंत्राटदार 10 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांकडून भर उन्हात काम करून घेत आहे.

ही अल्पवयीन मुले-मुली 39°C डिग्री तापमानात पटरीवरील गिट्टी लावणे, रुळांना ऑईल लावणे अशी कामे करत असून रेल्वे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे कानाडोळा केलाय. आजच्या अत्याधुनिक युगात रेल्वेसारख्या विभागाकडून बालकांच्या होणाऱ्या शोषणावरून जनसमान्यांतून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT