महाराष्ट्र

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Chikhaldara Tourists Vehicle Falls 600 Feet Deep Valley: चिखलदरा येथे पर्यटकांची कार ६०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडलीय. अमरावती डीडीआरएफ पथकाने धाडसीपणे दोरीचा वापर करून सर्वांचे प्राण वाचवले.

Bharat Jadhav

चिखलदरा घाट रस्त्यावर पर्यटकांची गाडी ६०० फूट खोल दरीत कोसळली.

गाडीत ६ लोक होते – ४ प्रौढ व २ मुले – सर्वजण किरकोळ जखमी.

डीडीआरएफ अमरावती पथकाने धाडसी रेस्क्यू करून सर्वांचे प्राण वाचवले.

सर्व पर्यटक सुरक्षित असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमर घटारे, साम प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे मोठा अपघात झालाय. चिखलदरा घाट रस्त्यामध्ये एक चार कार ६०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडलीय. हा अपघात शहापूर येथून अर्धा किलोमीटर पुढे घडलाय. मिळालेल्या माहितीनुसार, या कारमध्ये ६ जण होते. सुदैवाने या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नाहीये.

अनेक पर्यटक पावसाळी सहलीसाठी असतात.अमरावती जिल्ह्यातील पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी होताना दिसतेय. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.मात्र या आनंदावर दु:खाचं विरजन पाडणारी घटना चिखलदरा घाट रस्त्यामध्ये घडली. शहापूर येथून अर्धा किलोमीटर पुढे एका दरीत चारचाकी कार कोसळल्याची घटना घडली. या कारमध्ये सहा जण असल्याची माहिती समोर आलीय. चारचाकी कार ६००फूट खोल दरीत कोसळल्यानं अनेकजण चिंतेत पडले होते.परंतु सुदैवाने या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नाहीये.

अपघातग्रस्त वाहनामध्ये एकूण सहा व्यक्ती होते.२ मुलांचा समावेश होता. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच डीडीआरएफ अमरावती येथील टीमने आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व व्यक्तींना दरीतून सुखरूप बाहेर काढले. खोल दरीत पडलेल्या लोकांना दोराच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात आले. हे सर्व पर्यटक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambajogai News : स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला नगरपरिषद कार्यालयाबाहेर; अंबाजोगाईत लिंगायत समाज आक्रमक

Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

SCROLL FOR NEXT