cm Eknath Shinde
cm Eknath Shinde  saam tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आखला नवा प्लान, अख्खा महाराष्ट्रच पिंजून काढणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक

मुंबई : आमचीच शिवसेना खरी असा ढिंडोरा पिटणाऱ्या एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) निष्ठा यात्रा, संवाद यात्रा घेवून ठाकरी शैलीत सणसणीत इशारा देत आहेत. शिवसेनेचे नगरसेवक, आजी-माजी आमदार, खासदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पहिल्यांदाच महाराष्ट्राचा दौरा (Maharashtra Visit) करणार आहेत. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यावर पहिल्यांदाच राज्याचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. शिंदे यांच्या नव्या रणनीतीमुळं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर मिळणार असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली असून तमाम शिवसैनिकांना मार्गदर्शन करत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. औरंगाबादमध्ये पूरग्रस्त भाग, तसंच राज्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचंही समजते आहे.

जनतेला मुख्यमंत्री आपलेच आहेत, असे वाटले पाहिजे म्हणून दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान, मुख्यमंत्री चार दिवस मंत्रालयात आणि तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत दौऱ्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेही महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिंदे विरुद्ध ठाकरे असा जोरदार सामना रंगणार असल्याची चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गेल्या काही दिवसांपासून अॅक्टिव्ह मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. बंडाचं निशाण फडकावून गुवाहाटीत तळ ठोकणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारला (mva government) पायउतार केले. 'आवाज कुणाचा' अशी डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेलाही जोरदार धक्का दिला.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

SCROLL FOR NEXT