Narendra Modi and Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी द्या, एकनाथ शिंदेंची PM मोदींकडे मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मोठी मागणी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद असणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा (Marathi language) देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी,अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्राद्वारे केली आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार राज्य शासनाने १६ नोव्हेंबर २०१३ रोजी केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आवश्यक त्या निकषांची पूर्तता करीत असल्याचा निष्कर्ष या तज्ज्ञ समितीने काढला असून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.

राज्यातील मराठी भाषिक नागरिकांनी यासंदर्भात सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेंतर्गत सुमारे १ लाख २० हजारांहून अधिक पत्र राष्ट्रपतींना पाठविले आहेत. महाराष्ट्राच्या खासदारांनी वेळोवेळी याविषयी संसदेत प्रश्न उपस्थित केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मराठीला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाच्या विचाराधीन असल्याचे,केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी ३ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यसभेत सांगितले आहे. हा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे बऱ्याच कालवधीपासून प्रलंबीत असून त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळावी,अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

म्हाडाची बंपर ऑफर! मुंबईतील प्राईम लोकेशनवरील घरांची थेट विक्री, घरे भाड्यानं देण्यासही तयार

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् व्याजातून कमवा लाखो रुपये

Maharashtra Live News Update: धुळे जिल्ह्यासह जवळच्या जिल्ह्यांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Mumbai To Rajgad Travel: मुंबईपासून राजगड किल्ल्यापर्यंत प्रवास कसा करावा? ट्रेकिंग आणि ट्रॅव्हल टिप्स जाणून घ्या

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

SCROLL FOR NEXT