Chief Minister Shinde Student Yojana Saam TV
महाराष्ट्र

खुशखबर! लाडक्या बहिणीनंतर आता लाडक्या भावांना मिळणार 12000 रुपये; पंढरपुरातून मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

Chief Minister Eknath Shinde Announcement Student Scheme : लाडक्या बहिणीसारखीच लाडक्या भावांसाठीही अशीच योजना सुरु करण्यात यावी, अशी मागणी तरुणवर्गाकडून केली जात होती. हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

Satish Daud

राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे. त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, लाडक्या बहिणीसारखीच लाडक्या भावांसाठीही अशीच योजना सुरु करण्यात यावी, अशी मागणी तरुणवर्गाकडून केली जात होती. हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात शासकीय आज पहाटे शासकीय पूजा पार पडली. या पूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांसोबत संवाद साधला. राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखी-समाधानी होऊ दे, असं साकडं आपण विठुरायाकडे घातल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

राज्यात आपण लाडकी बहीण योजना (Mazhi Ladki Bahin Yojana) सुरू केली असून याचा लाभ लाखो महिलांना मिळत असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं. लाडक्या बहिणीप्रमाणेच आता आपण लाडक्या भावांना म्हणजेच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणार आहोत. आता बारावी विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये आणि डिग्रीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपये स्टायफंड देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

मुख्यमंत्री शिंदे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले, आपण राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली. पण पण लाडक्या भावाचं काय? त्यांच्यासाठीही आम्ही योजना सुरू केली आहे. त्यानुसार, आपला लाडका भाऊ म्हणजेच तरुण विद्यार्थी वर्षभर कंपनीत काम करेल, त्याला अप्रेंटीस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. त्या कंपनीत तो ट्र्रेन होईल. अप्रेंटीशीपचे पैसे सरकार भरणार आहे.

इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील महायुतीचे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दरम्यान, राज्यातील मुलींसाठी १०० टक्के मोफत उच्च शिक्षणाची सोय आपण केली आहे. शेतकऱ्यांसाठीही विविध योजना सरकारच्या माध्यमातून होत आहेत, असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nora Fatehi Photos: 'आयटम गर्ल' नोराचा तोरा, फोटो पाहून म्हणाल, ही तर बार्बीडॉलच

Maharashtra Live News Update: शिवाजीराव कर्डिले यांच्या अंत्यविधीसाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती

नांदेडमध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि पोलीस यांच्यात झटापट|VIDEO

नवऱ्यासोबत पुजेला बसली, हवन कुंडात तूप टाकलं अन् ओढणीनं पेट घेतला, महिलेचा होरपळून मृत्यू

Diwali 2025: नाशिकपासून फक्त ४५ किमी अंतरावर ऐतिहासिक मंदिरे; वन डे ट्रिपसाठी परफेक्ट पिकनिक स्पॉट्स

SCROLL FOR NEXT