CM Devendra Fadnavis warns ministers  Saam Tv
महाराष्ट्र

CM Fadnavis: वाद निर्माण झाला तर विचार करावा लागेल; पोस्ट कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंसह मंत्र्यांना झापलं

CM Devendra Fadnavis warns Ministers: महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या मंत्र्यांना कडक इशारा दिला. सरकारची प्रतिमा खराब करू शकणारी वादग्रस्त विधाने केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा फडणवीसांना दिलाय.

Bharat Jadhav

वादग्रस्त वक्तव्य टाळा, माध्यमांशी संवाद कमी करा, जर वाद निर्माण होणारी कृती घडली तर,सरकारची प्रतिमा मलिन होत असेल तर मला विचार करावा लागेल असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिलाय.आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांना करावाई करण्याचा इशारा दिलाय.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या सरकारमधील नेते वादग्रस्त विधान करत आहेत. त्यावरून विरोधक आक्रमक होत थेट मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. सर्व घडामोडी पाहता मुख्यमंत्री फडणवीस आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यावर कमालीचे नाराज झाले आहेत.

कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री महोदयांसोबत घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत मुख्यमंत्र्‍यांनी नाराजी व्यक्त करत मंत्र्‍यांना इशारा दिला. वादग्रस्त वक्तव्य टाळा, माध्यमांशी संवाद कमी करा, आणि वाद निर्माण होणारी कृती घडली तर तात्काळ स्वत: योग्य ते स्पष्टीकरण द्या, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्यात.

आज राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत आठ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट कॅबिनेटमध्ये मंत्र्‍यांची कानउघडणी केली. महायुती सरकारमधील काही मंत्र्‍यांच्या वर्तणुकीवर प्रश्न उपस्थित करत विरोधीपक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे, शिवसेनेचे योगेश कदम आणि संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय.

त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराजी व्यक्त केली. जर यापुढे सरकारला अडचण निर्माण होईल, अशी कृती केली तर आपल्याला विचार करावा लागेल, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिलाय.

माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, भरत गोगावले आणि योगेश कदम यांना मुख्यमंत्र्‍यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला. पोस्ट कॅबिनेट मधे सर्व अधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांचा आज राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा होती. आज अजित पवार आणि माणिकराव कोकटे यांची भेट झाली. यावेळी अजित पवारांनी कोकाटेंना दम भरला. यापुढे कुठलीही चूक पाठीशी घातली जाणार नसल्याचे म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT